Pune FDA Food Safety Action: पुणे विभागात एफडीएची मोठी कारवाई; २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त, ४०५ जणांना अटक!

सात महिन्यांत ६,९२४ आस्थापनांची तपासणी; ११३ अन्ननमुने असुरक्षित, २२४ आस्थापनांचे परवाने निलंबित
FDA Food Safety Action
FDA Food Safety ActionPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: अन्‍न औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांमध्ये पुणे विभागांतर्गत कारवाईचा धडाका लावत तब्ब सहा हजार ९२४ आस्थापनांवर करवाई केली आहे. यामध्ये २६ कोटी ३३ लाख रुपयांच्या अन्‍नपदार्थांचा साठा जप्त केला असून, यामध्ये ३०४ गुन्हे दाखल करून ४०५ जणांना अटक केली आहे.

FDA Food Safety Action
Pune Illegal Flex Banner Rules: पुण्यात फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा; नाव आणि फोटो असलेल्यांनाही गुन्ह्यात घेणार!

सात महिन्यांमध्ये राज्यभरात राबवलेल्या तपासणी मोहिमेमध्ये पुणे विभागात सर्वाधिक ६ हजार ९२४ तपासण्या झाल्या आहेत. तपासणीनंतर त्रुटी आढळलेल्या २ हजार ५३१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजाविण्यात आल्या, तर २२४ आस्थापनांचे परवाने निलंबित केले. यामध्ये १ हजार ५२८ हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि अन्य खाद्यपदार्थ आस्थापनांची तपासणी करून ८६९ सुधारणा नोटिसा दिल्या. तसेच, १२१ परवाने निलंबित केले.

FDA Food Safety Action
Pune Garbage Fine Rules: पुण्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेचा दंडुका; पाचव्यांदा नियमभंग केल्यास दुकान सील!

तसेच, विभागात ४ हजार ६४४ अन्‍नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी प्रयोगशाळेच्या तपासणीत ११३ नमुने असुरक्षित, ७६ नमुने कमी दर्जाचे आणि ३४ नमुने चुकीचे लेबल लावल्याचे आढळले. या प्रकरणांमध्ये २४ परवाने निलंबित केले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीत दुधाचे ४७३ नमुने घेतले होते. त्यातील सहा नमुने असुरक्षित आढळले, तर १ लाख ५७ हजार ९६५ लिटर दूध जप्त केले.

FDA Food Safety Action
Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये बिबट्याचा महिलांवर हल्ला; भात कापणी करताना एकीचा मृत्यू, दुसरी जखमी

या साठ्याची किंमत ६६ लाख ७३ हजार रुपये आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या ८५५ नमुन्यांपैकी ७ नमुने असुरक्षित आढळले असून, दुग्धजन्य पदार्थांचा २ कोटी ३२ लाख १७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. खाद्यतेल आणि मसाल्यांच्या तपासणीतही मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला. खाद्यतेलाच्या तपासणीत २ कोटी ६० लाख ७४ हजार रुपयांचा, तर मसाले व मसाला पदार्थांच्या तपासणीत ५ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त केल्याचे एफडीएच्या अहवालात नमूद केले.

FDA Food Safety Action
Pune Rooftop Solar Projects: पुणे जिल्ह्यात सौरऊर्जेचा झपाटा; ९५ हजारांहून अधिक ग्राहकांनी उभारले रूफटॉप प्रकल्प

पुणे विभाग कारवाई आकडेवारी

(१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६)

  • आस्थापनांची तपासणी - ६,९२४

  • संकलित अन्न नमुने - ४,६४४

  • असुरक्षित निष्पन्न नमुने - ११३

  • सुधारणा नोटिसा - २,५३१

  • परवाने निलंबित - २२४

  • जप्त साठा किंमत - २६.३३ कोटी

  • दाखल गुन्हे - ३०४

  • अटक व्यक्ती - ४०५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.