Pune FDA Action: पुणे विभागात FDA ची धडक कारवाई; १२ आस्थापनांचे परवाने-नोंदणी निलंबित, ५९८ किलो मावा जप्त

‘सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; पुणे-पिंपरीत सात आस्थापनांवर कारवाई, १.४९ लाखांचा मावा जप्त
Hotel License Suspended
Hotel License SuspendedPudhari
Published on
Updated on

पुणे: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुणे विभागात प्रशासनाने धडक कारवाई करत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सांगली परिसरातील १२ आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित केले आहेत. या धडक कारवाईत केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सात आस्थापनांवर बडगा उगारला असून, कोंढवा बुद्रुकमध्ये १ लाख ४९५०० रुपयांचा ५९८ किलो मिठा मावा जप्त केल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Hotel License Suspended
Pune Municipal Corporation Corruption: पुणे महापालिकेतील टीडीआर मंजुरीवर गंभीर आरोप; ‘रेटकार्ड’ची चर्चा, पैसे न दिल्यास फाइल रखडवल्याचा दावा

अन्न व औषध प्रशासनाने दि. १ ते १० ऑगस्टदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी घाण, अस्वच्छता, मुदतबाह्य खाद्यपदार्थांची साठवणूक आणि अन्नसुरक्षा नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील द लोटस रिसॉर्ट, द मसल फुड्स, हुमा बेकरी, न्यू महाराष्ट्र बेकर्स, माराकेश व्हेंचर्स, स्विन्स्टा ईएनटी आणि श्रीकृष्णा किराणा स्टोअर्स यांच्यावर परवाना अथवा नोंदणी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Hotel License Suspended
Viman Nagar Pub Raid: विमाननगरमध्ये पहाटे साडेतीनपर्यंत पब सुरू; गुन्हे शाखेचा छापा, २.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोंढवा बुद्रुक येथील कर्णी पार्किंग परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि अमली पदार्थविरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली. एआर ११ ई २००१ क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता ५९८ किलो मिठा मावा आढळून आला. विनापरवाना विक्रीसाठी वाहतूक केला जात असलेला हा मावा जप्त केला. त्याची किंमत १ लाख ४९५०० रुपये आहे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नियम तोडणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

Hotel License Suspended
Maharashtra SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळायचे आहे? अर्ज क्रमांक ७ भरून हरकत घेता येणार; सुनावणीनंतरच निर्णय

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराच या कारवाईतून दिला आहे. पुणे विभागाचे सहआयुक्त दि. भोगावडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त (अन्न) नीलेश खोसे तसेच अन्नसुरक्षा अधिकारी खे. ल. सोनकांबळे, प्रतीक जाधव आणि स्नेहल येणारे यांनी ही कारवाई केली.

Hotel License Suspended
Law Admission CAP Round: विधी प्रवेशासाठी पसंतीक्रम भरण्यास दोन दिवसांची मुदतवाढ; ११ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

एफडीएने कारवाई केलेली हॉटेल्‍स

  • द लोटस रिसॉर्ट, मोरावे, लोणावळा

  • द मसल फुड्स (बेकरी), बिबवेवाडी

  • हुमा बेकरी, गणेशनगर, पिंपरी-चिंचवड

  • न्यू महाराष्ट्र बेकर्स, दत्तनगर रोड, आंबेगाव बुद्रुक

  • माराकेश व्हेंचर्स, पर्वती, सहकारनगर

  • हॉटेल मंदर, तासगाव, सांगली

  • स्विन्स्टा ईएनटी, वारजे जकात नाका, कर्वेनगर

  • श्रीकृष्णा किराणा स्टोअर्स, साखराळे, सांगली

  • हॉटेल रॉयल सागर बीअर बार अँड परमिट रूम, चिंचणी, तासगाव

  • हॉटेल जी. एम. वडेवाला, पलूस, सांगली

  • भोसले सरकार चायनीज सेंटर, पलूस, सांगली

  • हॉटेल द मास्टर शेफ, मिरज, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news