Law Admission CAP Round: विधी प्रवेशासाठी पसंतीक्रम भरण्यास दोन दिवसांची मुदतवाढ; ११ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

तीन आणि पाच वर्षांच्या लॉ अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीत बदल; ‘ॲटो फ्रिज’ पद्धत रद्द, तिसऱ्या फेरीनंतर जागावाटप अंतिम
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

पुणे: विधी तीन वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतील कॅप फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याच्या अंतिम मुदतीत दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम भरायचे आहेत. त्याचबरोबर प्रवेशप्रक्रियेतील ॲटो फ्रिज, फ्रिज, बेटरमेंट, तिसऱ्या फेरीनंतर जागावाटपाच्या प्रक्रियेत सुधारणा केल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Admission
Aundh District Hospital ICU: औंध जिल्हा रुग्णालयातील ५० खाटांच्या आयसीयूवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या निधीच्या वापराची चौकशी

तीन आणि पाच वर्षे विधी अभ्यासक्रमांच्या फेरीसाठी अर्ज भरण्याची आणि सादर करण्याची सुधारित अंतिम मुदत ११ ऑगस्ट २०२६ आहे. संबंधित उमेदवारांनी या मुदतीची नोंद घेऊन निर्धारित कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी. मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. राज्यात ३ व ५ वर्षीय या दोन्ही विधीचे मिळून आजपर्यंत एकूण ९८ महाविद्यालयाची भर पडली आहे. सध्या दोन्ही विधीचे मिळून २४७ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

Admission
Pune University Professor Recruitment: पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीत ‘एक कोटींचा रेट’? रोहित पवारांचा गंभीर आरोप

ॲटो फ्रिज पद्धत रद्द

प्रथम आणि द्वितीय कॅप फेरीमध्ये उमेदवारास त्याच्या प्रथम पसंतीक्रमावरील महाविद्यालयामध्ये जागेचे वाटप झाल्यास, संबंधित जागा आपोआप राखीव राहणार नाही. प्रथम पसंतीक्रमावरील जागावाटप झालेल्या उमेदवारासह प्रत्येक उमेदवारास वाटप झालेली जागा फ्रिज करणे किंवा बेटरमेंट पर्याय निवडणे यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचा अधिकार राहील. विद्यमान प्रवेश नियमांनुसार प्रवेश निश्चित करावा.

Admission
Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla: माउलींच्या पालखी सोहळ्याची आळंदीत नगरप्रदक्षिणेने सांगता; वारकऱ्यांनी धरली परतीची वाट

तिसऱ्या फेरीनंतर जागावाटप अंतिम

तिसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर बेटरमेंटची कोणतीही संधी उपलब्ध राहणार नाही. तिसऱ्या फेरीत केलेले जागा वाटप अंतिम समजण्यात येईल. संबंधित उमेदवाराने दिलेल्या मुदतीत वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहील.

Admission
Pune BJP Tiranga Rally: भाजपच्या तिरंगा रॅलीवरून पुण्यात राजकीय वाद; २० हजार दुचाकींमुळे वाहतूक कोंडीची भीती

बेटरमेंट पर्यायाचा असा करा वापर

ज्या उमेदवारास पुढील कॅप फेरीमध्ये उच्च पसंतीक्रमावरील महाविद्यालय अथवा नव्याने मान्यता प्राप्त झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी विचार व्हावा, असे वाटत असेल, अशा उमेदवाराने लॉग- इनद्वारे एक हजार रुपये भरावे आणि बेटरमेंट पर्याय निवडावा. अशा उमेदवारांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र समजले जाईल. बेटरमेंट पर्याय निवडलेल्या उमेदवारांना द्वितीय व तृतीय फेरीपूर्वी नवीन पसंतीक्रम भरण्याचे अथवा पूर्वी भरलेल्या पसंतीक्रमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची मुभा राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news