पुणे : भरधाव जीपने दुचाकीस्वारांना उडवले ; ४ जण गंभीर जखमी

पुणे : भरधाव जीपने दुचाकीस्वारांना उडवले ; ४ जण गंभीर जखमी
Published on
Updated on

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : बारामती-इंदापूर रस्त्यावरील सणसर (ता. इंदापूर) येथे भरधाव जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दोन दुचाकींना उडवले. या अपघातांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले.

सणसर येथे बारामती-इंदापूर रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक शाळेजवळ बारामतीकडून इंदापूरकडे भरधाव चाललेल्या (एमएच ४२ बीई १००१) जीप चालकाचा ताबा सुटल्याने दोन दुचाकीवरील तिघाजणांना उडवले. तर याठिकाणी सरबत पिण्यासाठी थांबलेल्या एका जणाला धडक दिली. या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले. या अपघातात जीपने एका दुचाकी चालकाला प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीमध्ये दाबून भिंत पाडली. येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news