Pune Police News: पुण्यात मद्यधुंद महिलेची महिला पोलिस कर्मचाऱ्याला चापट; गुन्हा दाखल

लायटर मागण्यावरून विचारणा करताच शिवीगाळ आणि मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटना
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: मला लायटर का मागितले, म्हणताच मद्यधुंद महिलेने शिवीगाळ करत महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या गालावर चापट मारल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police
Pune Market Yard Ambulance: पुणे मार्केट यार्डात रुग्णवाहिकेअभावी व्यक्तीचा मृत्यू; वैद्यकीय सुविधांवर प्रश्नचिन्ह

ययाती मोतीगीर बामणे (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शीतल सुधाकर मोरे (वय ४८, रा. नोबल हॉस्पिटल जवळ, हडपसर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Police
Pune Dussehra Celebration: पुणेकरांचा दसरा उत्साहात; सोने, वाहन खरेदीसह नव्या कार्यांचा शुभारंभ

ही घटना १८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक ७ येथील अ‍ॅनिस हॉटेलजवळ घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, बामणे या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

Police
Pune Cycle Tracks: पुण्यात ७५ किमीचे सायकल ट्रॅक उभारणार; जुन्या ट्रॅकच्या अपयशातून महापालिका घेणार धडा?

रात्री गस्तीवर असताना वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी सीआर मोबाइल वाहन बाजूला लावले होते. त्या वेळी आरोपी महिला तेथे आली. विनाकारण शिवीगाळ करून लायटर मागितले. फिर्यादी यांनी मला तू कसे काय लायटर मागितले, अशी विचारणा केली असता आरोपीने पुन्हा शिवीगाळ करत त्यांच्या गालावर चापट मारली आणि गोंधळ घातला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news