Pune Market Yard Ambulance: पुणे मार्केट यार्डात रुग्णवाहिकेअभावी व्यक्तीचा मृत्यू; वैद्यकीय सुविधांवर प्रश्नचिन्ह

आरोग्य शिबिरादरम्यान प्रकृती बिघडली, पण वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही; स्वतंत्र रुग्णवाहिकेची मागणी
108 Ambulance
108 Ambulance Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कोट्यवधींची उलाढाल अन्‌ हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या गुलटेकडी मार्केट यार्डात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सोमवारी (दि. १९) येथील शारदा गजानन मंदिरासमोर पोटात तीव्र वेदना होत असलेल्या एका व्यक्तीला वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे बाजार समितीच्या वैद्यकीय व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

108 Ambulance
Pune Dussehra Celebration: पुणेकरांचा दसरा उत्साहात; सोने, वाहन खरेदीसह नव्या कार्यांचा शुभारंभ

बाजार आवारात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान संबंधित व्यक्तीला त्रास होत असल्याचे पाहून तेथे उपस्थित डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. दरम्यान, काची प्रतिष्ठानाने यापूर्वी श्री शारदा गजानन मंडळाला रुग्णवाहिका भेट दिली होती. काही दिवस ती मंडळाच्या प्रांगणात दिसली.

108 Ambulance
Pune Cycle Tracks: पुण्यात ७५ किमीचे सायकल ट्रॅक उभारणार; जुन्या ट्रॅकच्या अपयशातून महापालिका घेणार धडा?

मात्र, त्यानंतर ती नजरेआड झाली. ही रुग्णवाहिका नेमकी गेली कुठे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. बाजार समितीला विविध शुल्कांतून उत्पन्न मिळते. मात्र, व्यापारी, हमाल, कामगार आणि ग्राहकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. बाजारातील घटकांच्या जीविताशी प्रशासनाला काही देणेघेणे आहे की नाही? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल बाजार घटकांमधून उपस्थित होत आहे.

108 Ambulance
Pune Swargate Extortion Case: पुण्यात अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून ५० हजार उकळल्याचा आरोप; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

मार्केट यार्डात तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करा!

मार्केट यार्डातील वाढती गर्दी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता बाजार समितीने तातडीने नवीन रुग्णवाहिका खरेदी करावी, अशी मागणी कामगार नेते आणि संचालक संतोष नांगरे यांनी केली आहे. बाजारात आपत्कालीन वैद्यकीय सुविधा नसल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येतात. शेतकरी, व्यापारी, हमाल आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

108 Ambulance
Pune Yerawada Drainage Accident: पुण्यात ड्रेनेजच्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

घटना घडल्यानंतर आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली. तसेच, याबाबतचा अहवाल सचिव तसेच सभापतींना कळविण्यात आला आहे. भविष्यात यास्वरूपाच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाची स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची आवश्यकताही अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. संचालक मंडळ त्याबाबत सकारात्मक असून भविष्यात यास्वरुपाच्या घटनांना आळा बसून त्या टाळता येतील.

नितीन चौरे, विभागप्रमुख, फळे व तरकारी विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news