पोलिसांनी आतापर्यंत दोन गुन्ह्यांत तब्बल 28 जणांना अटक केली. पोलिस, ससून आणि कारागृहातील कर्मचारी डॉक्टरांचा त्यामध्ये सहभाग आहे. ललित आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात ललितचा वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली मुक्काम होता. रुग्णालयातील आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. सहभागी असेल त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार आहे.– रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर