

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य अमेरिकनमधील देश होंडुरासमध्ये मंगळवारी (दि.५) एक बस महामार्गावरून घसरून दरीत कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हून दोन डझन अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे ६० जण प्रवास करत होते. देशाची राजधानी तेगुसिगाल्पा पासून सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) महामार्गावर हा अपघात झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघांचा तेगुसिगाल्पा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. (Honduras Accident)
होंडुरासचे राष्ट्राध्यक्ष झिओमारा कॅस्ट्रो यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की," सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे."ही एक शोकांतिका आहे. कॅस्ट्रो यांनी पुढे लिहिले की सरकार पीडितांच्या अंत्यसंस्काराचा खर्च भरेल.
हेही वाचा