Pune DP Roads Development: पुण्यात होणार 10 दर्जेदार रस्त्यांचा विकास! महापालिकेचा पहिला टप्पा जाहीर

2026-27 अंदाजपत्रकात स्वतंत्र निधी; कात्रज–बाणेर–बालेवाडी–पाषाण परिसरातील प्रमुख मार्गांना प्राधान्य
Pune DP Roads Development
Pune DP Roads DevelopmentPudhari
Published on
Updated on

पुणे : शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) प्रमुख रस्ते एकाच वेळी विकसित करण्यासाठी निधी अपुरा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले 10 रस्ते निवडून त्यांचा संपूर्ण विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Pune DP Roads Development
Free Emergency Ambulance: आपत्कालीन ‘108’ रुग्णवाहिका ठरली जीवदान! 1 कोटी 14 लाखांहून अधिक नागरिकांना मोफत सेवा

या कामांसाठी पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र निधी तरतूद केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. या प्राधान्य रस्त्यांत कात्रज, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील मार्गांचा समावेश आहे.

Pune DP Roads Development
Amedia Stamp Duty Penalty Pune: ‘अमेडिया’ला भरावा लागणार दंडासहित मुद्रांक शुल्क; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

महापालिकेने डीपीतील 10 महत्त्वाच्या रस्त्यांची यादी तयार केली आहे. हे रस्ते पूर्ण विकसित झाल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळेल, तसेच नागरिक आणि वाहनचालकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

Pune DP Roads Development
School Trip ST Bus Accident: शालेय सहलीच्या दोन एसटी बसची भीषण धडक! 20 विद्यार्थी व 5 शिक्षक जखमी

आयुक्त राम म्हणाले की, महापालिकेच्या 2026-27 च्या अंदाजपत्रकात या दहा रस्त्यांसाठी विशेष निधी ठेवण्यात येणार आहे. या निधीतून रस्त्यांचा व्यापक व दर्जेदार विकास केला जाईल. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात इतर रस्त्यांची निवड करून त्यांचे काम हाती घेतले जाणार आहे. पथ विभाग सध्या या प्राधान्य रस्त्यांची यादी अंतिम करत असून, रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाल्याने महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news