Pune Dowry Harassment Case: पुण्यात पुन्हा एक हुंडाबळी; प्रसिध्द व्यावसायिकेच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल

५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा; पतीला अटक, माहेरच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त
Zambre Family
Zambre FamilyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्याला हादरून सोडणारी आणखी एक हुंडाबळीची घटना वर्षभरानंतर पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. मुलगी झाली म्हणून अतोनात छळ, ५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये देऊनही सासरच्यांकडून पैशांची होणारी मागणी, माहेरची जमीन नावावर करण्यासाठी दबाव आणि दिवाळीत आणखी पाच तोळे सोने देण्यासाठी तगादा...

Zambre Family
Pune District Court Bomb Threat: पुणे जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; पाच तास तपासणी, न्यायालयीन कामकाज ठप्प

या छळाला कंटाळून प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेने मुकुंदनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला. आत्महत्येपूर्वी सुनेने ‘माझ्या मृत्यूला सासू जबाबदार’ असा भावाला संदेश पाठविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाइकांनी झांबरे यांच्या घरासह कार्यालयाची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, पती अक्षयला रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली.

Zambre Family
Pune Municipal Corporation Bomb Threat: पुणे महापालिकेचे महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

पायल अक्षय झांबरे (वय ३४, रा. झांबरे पॅलेस, मुकुंदनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या महिलेचे नाव आहे. याबाबत त्‍यांचा भाऊ ऋषिकेश पवार (वय ३१, रा. खेड शिवापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३८), सासरे अरविंद झांबरे (वय ६५), सासू मंगल झांबरे (वय ५८) आणि नणंद अक्षता झांबरे-निम्‍हण (वय ३०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

५० तोळे सोने, २५ लाखांची रोकड; तरीही मागण्यांची भूक संपत नव्हती...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये पायल यांचा अक्षय यांच्याशी विवाह झाला होता. विवाहावेळी माहेरच्यांनी ५० तोळे सोने, २५ लाख रुपये रोख आणि लग्नासाठी सुमारे ७० ते ८० लाख रुपये खर्च केला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून पैशांसह सोन्याची मागणी सुरू झाली. मार्च २०२३ मध्ये पायल यांनी मुलीला जन्म दिल्यानंतर त्यांचा छळ अधिकच वाढल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मुलगा झाला नाही म्हणून रुग्णालयातच वाद घालण्यात आला. आई आणि बाळाचा सांभाळ करणार नसल्याचे सांगून सासरच्या मंडळींनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर पायल जवळपास वर्षभर माहेरी राहिल्या. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्या पुन्हा सासरी परतल्या. मात्र, त्यानंतरही छळ थांबला नाही. ‘तुला मुलगी झाली आहे, फ्लॅटमध्ये दोरी आहे, ओढणीने पंख्याला लटकून जा,’ अशा अपमानास्पद शब्दांत त्यांना हिणवले जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वडिलांच्या नावावरील जमीन मुलाच्या नावावर करावी; अन्यथा घटस्फोट घेऊन निघून जावे, असा दबावही त्यांच्यावर टाकला जात होता.

Zambre Family
Pune Illegal Firecracker Stalls: पुण्यात अनधिकृत फटाका स्टॉल्सचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

दिवाळीसाठी पाच तोळे सोन्याचा तगादा; भावाला पाठवला शेवटचा संदेश

रविवारी (१ नोव्हेंबर) पायल खेड शिवापूर येथील माहेरी गेल्या होत्या. दिवाळीसाठी पाच तोळे सोने आणण्याचा सासरच्या मंडळींकडून तगादा सुरू असल्याचे त्यांनी भावाला सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी त्या कॅबने पुण्यात परतल्या. रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी त्यांनी भावाच्या मोबाईलवर ‘माझ्या आत्महत्येला माझी सासू जबाबदार आहे,’ असा संदेश पाठविला. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. भावाने पती अक्षय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरेरावीची भाषा करून फोन कट केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी माहेरचे नातेवाईक मुकुंदनगर येथील घरी पोहचले. पायल कुठे आहेत, याबाबत सासरच्या मंडळींकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नातेवाइकांचा संशय बळावला. त्यानंतर भावाने पार्किंगमधून मागील गॅलरीत जाऊन हॉलची काच फोडून घरात प्रवेश केला. त्या वेळी किचनमध्ये पायल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची पुनरावृत्ती

पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी शशांक हगवणे हिच्या १६ मे २०२४ रोजी संशयास्पद मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती. राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबाने हुंडा व पैशासाठी अतोनात छळ केल्याचा आरोप त्या वेळी वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. असाच प्रकार पुन्हा एकदा पुण्यात सोमवारी झांबरे कुटुंबांतील सून पायल अक्षय झांबरे हिच्याबाबत घडल्याचे समोर आलेले आहे. हुंडाबंदीच्या विरोधात कायदा असूनही ही कुप्रथा सुरूच आहे. गर्भश्रीमंत किंवा पैशात खेळणाऱ्या राजकीय नेत्याच्या घरीसुद्धा हुंडा घेणे बंद झालेले नाही, हे या घटनेने पुढे आले आहे.

Zambre Family
Pune Rain Update: दिवाळीत पुण्यावर पावसाचे सावट; २४ तासांत ४१.९ मिमी पाऊस, शहरात गारठा वाढला!

घटना १ - वैष्णवी हगवणे

(मे २०२५) तारीख : १६ मे २०२५

ठिकाण : भुकूम, मुळशी तालुका (पुणे जिल्हा)

घटना : २४ वर्षीय वैष्णवी यांनी सासरच्या घरी आत्महत्या केली. कुटुंबीयांनी आरोप केला, की लग्नानंतर मोठ्या प्रमाणात हुंडा दिल्यानंतरही सासरकडून सुमारे २ कोटी रुपयांच्या मागण्या आणि छळ सुरू होता. पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे (माजी राजकीय नेते) आणि इतरांना झाली होती अटक.

घटना २ - स्वाती सूरज पाठक (जून २०२५)

तारीख : जून २०२५ च्या सुरुवातीस (अहवाल ९ जून २०२५)

ठिकाण : केसनंद, पुणे शहर

घटना : २० वर्षीय स्वाती यांनी सासरच्या घरी आत्महत्या केली. मार्च २०२४ मध्ये लग्न झाले होते. पती आणि सासरकडून पैशाच्या मागण्या, अपमान आणि शारीरिक-मानसिक छळाचे आरोप.

घटना ३ - दीप्ती चौधरी (जानेवारी २०२६)

तारीख : २४ जानेवारी २०२६

ठिकाण : सोरतापवाडी,

हवेली तालुका

घटना : ३० वर्षीय दीप्ती यांनी सासरच्या घरी आत्महत्या केली. कुटुंबीयांनी आरोप केला, की मोठ्या प्रमाणात हुंडा (सुमारे ३५ लाख रुपये आणि सोने) दिल्यानंतरही सतत मागण्या सुरू होत्या. शिवाय गर्भवती असताना मुलीचे गर्भपात करण्याचा दबाव असल्याचा आरोप. पती आणि सासू (सरपंच) यांना अटक.

घटना ४- गंगा तेजस बेंबाळकर (फेब्रुवारी २०२६)

तारीख : १९ फेब्रुवारी २०२६

ठिकाण : बाणेर, पुणे

घटना : २७ वर्षीय गंगा यांनी इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्न. कुटुंबीयांनी आरोप केला, की लग्नानंतर अतिरिक्त २१ तोळे सोन्याची मागणी आणि छळ. पती आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल.

घटना ५ - तेजस्विनी गोरख सोनावणे (जून २०२६)

तारीख : २ जून २०२६

ठिकाण : चंदननगर, पुणे

घटना : २५ वर्षीय तेजस्विनी यांनी आत्महत्या केली. पती आणि सासरकडून पैसे, कार, फ्लॅट आणि सोन्याची मागणी तसेच छळाचे आरोप. पती, सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा.

घटना ६ - सोनाली समधन चंदनशिवे (सप्टेंबर २०२६)

तारीख : सप्टेंबर २०२६ च्या सुरुवातीस (अहवाल

५ सप्टेंबर २०२६)

ठिकाण : वडापुरी, इंदापूर तालुका

घटना : २१ वर्षीय गर्भवती (५ महिने) सोनाली यांनी आत्महत्या केली. लग्नानंतर फ्लॅटसाठी १ लाख रुपयांची मागणी आणि छळाचे आरोप. पती आणि

सासरच्यांवर गुन्हा.

घटना ७ - वैष्णवी प्रवीण जरंडे/ओंकार घिसारे प्रकरण (सप्टेंबर २०२६)

तारीख : २४ सप्टेंबर २०२६

ठिकाण : उंड्री, पुणे

घटना : आयटी प्रोफेशनल (२३-२५ वर्षे) यांनी सासरच्या घरी आत्महत्या केली. लग्नात मोठा खर्च आणि सोने दिल्यानंतरही कारसाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांच्या मागण्या आणि छळाचे आरोप.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.