Pune Municipal Corporation Bomb Threat: पुणे महापालिकेचे महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

धमकीचा ई-मेल मिळताच महापालिका भवन आणि मेट्रोस्थानकांवर बॉम्बशोधक पथकाची तपासणी
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महापालिकेतील महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी दुपारी ४ वाजता महापालिकेला प्राप्त झाला. महापालिका प्रशासनाने ई-मेलची खातरजमा केल्यानंतर रात्री आठ वाजता पोलिस प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने महापालिका भवनासह मेट्रोस्थानकांवर तपासणी मोहीम सुरू केली.

Pune Municipal Corporation
Pune Illegal Firecracker Stalls: पुण्यात अनधिकृत फटाका स्टॉल्सचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

धमकीचा ई-मेल मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने महापालिका भवनाची कसून तपासणी केली. महापालिका भवनाची तपासणी पूर्ण झाली असून, तेथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Municipal Corporation
Pune Rain Update: दिवाळीत पुण्यावर पावसाचे सावट; २४ तासांत ४१.९ मिमी पाऊस, शहरात गारठा वाढला!

दरम्यान, धमकीच्या ई-मेलच्या पार्श्वभूमीवर मेट्रोस्थानकांवरही तपासणी करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत मेट्रोस्थानकांची तपासणी सुरू होती. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असलेल्या या ठिकाणी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

Pune Municipal Corporation
Maharashtra Touring Talkies: यंदा यात्रा-जत्रांमध्ये तंबू थिएटरचा पडदा पडणार? आर्थिक संकटामुळे टुरिंग टॉकीज बंद ठेवण्याचा निर्णय

महापालिकेला यापूर्वीही अशाच स्वरूपाचा धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. त्या वेळी संदेश पाठवणाऱ्याने स्वतःचा संबंध खलिस्तान नॅशनल आर्मी या नावाशी जोडल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे नव्याने आलेल्या धमकीच्या ई-मेलची पोलिसांकडून गांभीर्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Pune Municipal Corporation
Nanawada Heritage Conservation: पुण्यातील ऐतिहासिक नानावाड्याच्या संवर्धनासाठी ६० लाखांचा निधी; लवकरच दुरुस्तीला सुरुवात

हा ई-मेल कुठून आणि कोणी पाठवला, तसेच यापूर्वी आलेल्या धमकीच्या संदेशाशी त्याचा काही संबंध आहे का? याचा तांत्रिक तपास केला जात आहे. वारंवार येणाऱ्या अशा धमक्यांमुळे महापालिका आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.