Pune Illegal Firecracker Stalls: पुण्यात अनधिकृत फटाका स्टॉल्सचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

महापालिकेची ११ ठिकाणी १८४ स्टॉल्सनाच परवानगी; दाट लोकवस्ती, फुटपाथ आणि अरुंद गल्ल्यांत बेकायदा विक्री सुरू
Municipal Corporation Firecracker Stalls
Municipal Corporation Firecracker StallsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनधिकृत फटाका स्टॉल्सचा सुळसुळाट झाला असून, दाट लोकवस्ती, मुख्य बाजारपेठा, फुटपाथ आणि अरुंद गल्लीबोळांतही बिनधास्तपणे फटाक्यांची विक्री सुरू आहे. महापालिकेने शहरातील केवळ ११ ठिकाणी १८४ फटाका स्टॉल्सना परवानगी दिली असताना शहरभर शेकडो अनधिकृत स्टॉल्स उभारण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Municipal Corporation Firecracker Stalls
Pune Rain Update: दिवाळीत पुण्यावर पावसाचे सावट; २४ तासांत ४१.९ मिमी पाऊस, शहरात गारठा वाढला!

आग आणि इतर दुर्घटनांचा धोका लक्षात घेऊन महापालिकेकडून दरवर्षी मोकळ्या जागा, मैदाने अथवा नदीपात्रातच फटाका स्टॉल्सना परवानगी दिली जाते. यंदाही लिलाव प्रक्रियेतून ११ ठिकाणी १८४ स्टॉल्सना मंजुरी देण्यात आली आहे. या स्टॉल्ससाठी तब्बल ४० अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.

Municipal Corporation Firecracker Stalls
Maharashtra Touring Talkies: यंदा यात्रा-जत्रांमध्ये तंबू थिएटरचा पडदा पडणार? आर्थिक संकटामुळे टुरिंग टॉकीज बंद ठेवण्याचा निर्णय

मात्र, या नियमांना हरताळ फासत सदाशिव पेठेसह दाट लोकवस्तीच्या भागांत, सिंहगड रस्त्यावरील फुटपाथवर तसेच गल्लीबोळांतील रस्त्यांवर फटाका स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडून, रस्ता अड­वून स्टॉल्स थाटण्यात आल्याचे चित्र आहे.

Municipal Corporation Firecracker Stalls
Nanawada Heritage Conservation: पुण्यातील ऐतिहासिक नानावाड्याच्या संवर्धनासाठी ६० लाखांचा निधी; लवकरच दुरुस्तीला सुरुवात

अनेक स्टॉल्स साध्या कापडी शेडमध्ये उभारण्यात आले असून, त्यामुळे आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. नियमांनुसार दोन फटाका विक्री गाळ्यांमध्ये किमान तीन मीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. तसेच स्टॉल मुख्य रस्ता किंवा इतर आस्थापनांपासून किमान दहा मीटर दूर असणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र या नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे.

Municipal Corporation Firecracker Stalls
Pune Water Supply Disruption: पुण्यात सलग तीन दिवस पाणीपुरवठ्याचा खोळंबा; मध्यवर्ती पेठांसह उपनगरांना कमी दाबाने पाणी

दरम्यान, अनधिकृत फटाका स्टॉल्सवर कारवाई करण्याचे पत्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने अतिक्रमण नियंत्रण विभागाला दिले आहे. अग्निशमन दलाची रीतसर परवानगी नसलेल्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. तरीही शहरभर अनधिकृत स्टॉल्स सुरू असल्याने महापालिकेची कारवाई नेमकी कधी होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.