

पुणे: आखातातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे वितरण बंद करण्यात आले असले, तरी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा मात्र सुरळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असे आवाहन गॅसवितरक संघटनेने केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी 21 ऐवजी 25 दिवसांनंतर करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याकडील सिलिंडर रिफिल करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशात बुकिंगच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने ग््रााहकांची चिंता आणखीनच वाढली. त्यामुळे काही ठिकाणी
वितरकांच्या दारात ग््रााहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसते. तथापि, अजूनही गॅसचा पुरवठा नियमित आहे. नोंद झालेला गॅस दिलेल्या वेळेवर ग््रााहकाला देण्याचा वितरकांचा प्रयत्न असतो, त्यामुळे गॅस धारकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन इंडेन, भारत गॅस आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांशी संबंधित वितरक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण खंडाळकर यांनी केले आहे.
कोथरुडमधील प्रताप गॅस एजन्सीचे संचालक नरेंद्र सपट या संदर्भात बोलताना म्हणाले की, गॅस सिलिंडरचा पुरवठा व्यवस्थित आहे. मात्र, लोकांमध्ये घबराट असल्याने गॅस सिलिंडरची मागणी वाढली आहे. तरीही ऑनलाईन पद्धतीने बुक केलेल्या ग््रााहकाकडून ओटीपीची खातरजमा केल्यानंतरच सिलिंडरचे वितरण केले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘देशात पुरेसे इंधन उपलब्ध आहे’
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येणारी माहिती चुकीची आणि निराधार आहे. देशात पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध असून, त्याच्या पुरवठ्याबाबत नागरिकांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही; मात्र त्याचा वापर जपून करावा, असे आवाहन हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.