Pune Hotels Gas Shortage: गॅस टंचाईचे संकट; पुण्यात हॉटेल-रेस्टॉरंट बंद होण्याची भीती

युद्धामुळे कमर्शिअल सिलिंडर पुरवठा विस्कळीत; अनेक हॉटेल्सची किचन बंद पडण्याची शक्यता
Hotel Gas Shortage
Hotel Gas ShortagePudhari
Published on
Updated on

पुणे: आखातात भडकलेल्या युद्धामुळे कमर्शिअल गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला असून, घरगुती वापराच्या सिलिंडरवरही अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खानावळी बंद होतील, अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे विद्यार्थी, परगावाहून येणारे प्रवासी यांच्यासह अनेकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. सरकारने सिलिंडरचा पुरवठा थेट बंद करण्याऐवजी हॉटेल संघटनांशी चर्चा करून सिलिंडरचे रेशनिंग करणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही, अशी खंत पुणे रेस्टॉरंट्‌‍स अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी व्यक्त केली.

Hotel Gas Shortage
Junnar Gas Cylinder Rush: इंधनटंचाईच्या अफवांमुळे जुन्नरमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची धावपळ

राज्यात मुंबईपाठोपाठ सर्वाधिक रेस्टॉरंट, हॉटेल्स पुणे शहरात आहेत. कारण, पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, उद्योगनगरीमुळे मोठ्या हॉटेल्सच्या चेनदेखील शहरात आहेत. त्यामुळे बाहेरच्या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर आचारी व कर्मचाऱ्यांना मोठा रोजगार उपलब्ध होतो. शहरात सुमारे 35 हजार आचारी असून, त्यांच्यावर हॉटेलच्या रेसिपीची भिस्त असते. दररोज छोट्या रेस्टॉरंटला दोन ते तीन व्यावसायिक सिलिंडर (19 किलो) लागतात, तर पंचतारांकित हॉटेलमध्ये दररोज 10 ते 12 सिलिंडरचा पुरवठा होतो.

Hotel Gas Shortage
Maharashtra LPG Shortage: आखाती तणावाचा परिणाम; दौंड-ओतूर परिसरात गॅस टंचाईची भीती

काय म्हणाले हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी?

शहरात हॉटेलची संख्या सुमारे दहा हजारांवर असून, 1400 व्यावसायिक संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्यावर आणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे. सरकारने सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याची अधिसूचना काढली. ती काढण्यापूर्वी राज्यातील हॉटेल व्यावसायिक संघटनांशी चर्चा करणे अपेक्षित होते. उडुपी हॉटेलमधील डोसा हा पदार्थ आता बंद करावा लागेल. कारण, डोसा करताना जास्त गॅस खर्च होतो. आता जी थोडी फार हॉटेल सुरू राहतील, त्यांचे मेन्यू आता मर्यादित ठेवावे लागणार आहेत. पुणे रेस्टॉरंट्‌‍स अँड हॉटेलिअर्स असोसिएशनने पंतप्रधान, पेट्रोलियममंत्री यांच्यासह सर्व संबंधितांकडे शिष्टमंडळे पाठवून या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. आता हॉटेल इंडक्शन शेगडीवर चालवावी लागणार.

Hotel Gas Shortage
Aaple Sarkar Seva Kendra Colleges: पुणे जिल्ह्यात २८ महाविद्यालयांत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू

सिलिंडरचा काळा बाजार सुरू

कोरोना काळात रेमडिसिव्हर इंजेक्शनचा जसा काळा बाजार सुरू झाला होता, तसाच काळा बाजार आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या बाबतीत भारतात सुरू झाला आहे. त्याची झळ थेट पुणे शहरापर्यंत पोहचली असून, 19 किलो व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1 हजार 650 वरून मंगळवारी थेट 4 हजार 500 रुपयांवर गेल्याचे हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.

व्यावसायिक सिलिंडरचा दर 1650 वरून तब्बल 2800 रुपयांवर गेला, तरीही तो आम्ही वापरत आहोत. मात्र, आता त्याचाही पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय बंद करावा लागण्याची वेळ आली आहे. कारण, आपल्याकडे 175 ग््रााहक बसतील इतके मोठे रेस्टॉरंट आहे. एकूण 43 जणांचा स्टाफ आहे. रेस्टॉरंट बंद ठेवले तरी कर्मचारी बाहेरच्या गावांतून, राज्यांतून आलेले आहेत. त्यांचे पगार, त्यांना जेवण द्यावे लागणार आहे. आता त्यांचे जेवण चुलीवर बनविण्याची वेळ आली आहे.

योगेश झेंडे, संचालक, वीणा व्हेज, हडपसर

Hotel Gas Shortage
Pune Heatwave Temperature: पुण्यात उष्णतेचा तडाखा; कोरेगाव पार्क, लोहगावमध्ये पारा ३९ अंशांवर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू होताच कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर आकाशाला भिडले, तरीही युद्धामुळे उद्भवणारी परिस्थिती विचारात घेऊन शहरातील अनेक व्यावसायिकांनी जास्तीचे सिलिंडर घेऊन ठेवले. परंतु, हा साठाही येत्या दोन-तीन दिवसांत संपणार असल्याने हॉटेलचे किचन कसे सुरू ठेवायचे? हा मोठा प्रश्न आहे. हॉटेलिअर्स असोसिएशनच्या वतीने सिलिंडरचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी येत्या एक-दोन दिवसांत यातून मार्ग न निघाल्यास नाइलाजास्तव हॉटेल बंद करावे लागेल. हॉटेल बंद केल्याने ग््रााहकांची तर गैरसोय होईलच; शिवाय हॉटेल व्यावसायिकही अडचणीत येतील.

कार्तिक शेट्टी, संचालक, हॉटेल कवी, कोथरूड

या युद्धामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या चिंतेत टाकले आहे. यापूर्वी एवढे मोठे संकट व्यावसायिकांवर आले नव्हते. शहरातील अनेक गॅस एजन्सीजने पुरवठा बंद केल्यामुळे किचनची मॅनेजमेंट करायची कशी? हाच मोठा प्रश्न आहे. आता व्यावसायिक सिलिंडरसाठी फोन केला, तर 15 दिवसांनी फोन करा, असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा भाव (19 किलो) 1710 रुपये होता. त्याची किंमत वाढवून 1900 रुपयांवर गेली आहे. युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिले, तर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येईल, असे चित्र दिसत आहे.

राजेश शेट्टी, मालक, नैवेद्यम रेस्टॉरंट, पर्वती

दुर्गा कॅफेच्या पुणे परिसरात 60 शाखा असून, सिलिंडरअभावी वाकड व हिंजवडी परिसरातील शाखा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. गॅसच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी गॅसपुरवठादार कंपन्यांशीही संपर्क साधला. परंतु, जास्त पैसे देऊनही सिलिंडर देण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे काही शाखांचा वेळ कमी केला. परिणामी, व्यवसाय कमी झाला असून, येत्या दहा तारखेला कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शशांक मेंगडे, संचालक, दुर्गा कॅफे, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news