Pune Diwali faral: महिला व्यावसायिकांच्या घरगुती फराळाची जोरदार चलती; दिवाळीपूर्वी ऑर्डरचा पाऊस

चकलीपासून चिवड्यापर्यंत घरगुती फराळाला वाढती मागणी; सोशल मीडियावरून जोरदार प्रतिसाद
Pune Diwali faral
महिला व्यावसायिकांच्या घरगुती फराळाची जोरदार चलतीPudhari
Published on
Updated on

पुणे : दिवाळीचा आनंदी सण म्हटल्यावर स्वादिष्ट फराळ ठरलेलाच...चकली, चिवडा, करंजीपासून ते चिरोटे, शेव, शंकरपाळे....असा फराळ घराघरांत करण्याची पूर्वी रीत होती... ती आजही कायम आहेच. पण, आजच्या धावपळीच्या जीवनात नोकरदार महिलांकडे फराळ तयार करण्यासाठी वेळ नाही, त्यामुळेच महिला व्यावसायिकांनी तयार केलेल्या तयार घरगुती फराळाला मागणी वाढली आहे.(Latest Pune News)

Pune Diwali faral
Sangram Jagtap notice: आ. संग्राम जगताप यांच्यावरील निर्णय नोटिशीच्या उत्तरानंतर; अजित पवारांची माहिती

त्यात चकली, चिवडा, लाडू, शेव, करंजी अशा फराळाला सर्वाधिक मागणी असून, तयार घरगुती फराळ खरेदीचा ट्रेंड यंदाही वाढला आहे. फराळ साहित्यांच्या किंमती वाढल्यामुळे फराळाच्या किमतीतही 10 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुमारे चार हजारहून अधिक महिला व्यावसायिक फराळ तयार करण्याचा व्यवसाय करत आहेत. दिवाळीसाठी अनारसे, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळे अशा घरगुती फराळाला मागणी आहे. घरगुती चव, कमी तेलात वापरून केलेले जिन्नस, गुणवत्ता या कारणांमुळे घरगुती फराळाला चांगली मागणी आहे.

Pune Diwali faral
Pune Diwali shopping Mandai Metro: दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांचा ‘स्मार्ट’ निर्णय; मंडईला मेट्रोने जाणाऱ्यांची गर्दी

दिवाळीच्या पदार्थांची 50 टक्के बाजारपेठ ही घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी व्यापल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियासह अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, न्यूझीलंडसह दुबई येथे राहणाऱ्या मराठीभाषकांसाठीही त्यांचे पुण्यात राहणारे नातेवाइक टपालद्वारे फराळ पाठवत आहेत. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, महिला व्यावसायिकांनी तयार केलेल्या घरगुती फराळ खरेदीचा ट्रेंड यंदाही वाढला आहे. फराळ तयार करण्याच्या व्यवसायामुळे 30 ते 40 हजार महिलांना काम मिळाले आहे.

Pune Diwali faral
Janata Vasahat Pune: जनता वसाहत पुनर्विकास प्रकरणात मोठा वाद; नियमबाह्य टीडीआर मंजुरीवर मिसाळ यांचा आक्षेप

सोशल मीडिया प्रभावी माध्यम

सोशल मीडियाद्वारे महिला व्यावसायिक फराळ विक्रीची प्रसिद्धी करीत असून, त्यासाठी खास फेसबुक आणि इन्स्टाग््रााम पेज तयार करण्यात आले आहे. याशिवाय व्हॉट्‌‍सॲप ग््रुापद्वारेही ऑर्डर घेतल्या जात आहेत. यात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरत आहे.

घरगुतीचे दर किमान 350 रुपये किलो

घरगुती फराळाच्या किंमतीत यंदा वाढ झाली आहे. महिला व्यावसायिकांकडील फराळाच्या किंमती वेगवेगळ्या आहेत, त्या पद्धतीने खास पॅकेटमध्ये फराळ विकला जात आहे. महिला व्यावसायिकांना यासाठी दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली आहे. साधारणपणे एक किलोपुढील फराळ खरेदी केला जात असून, त्याची किमत 350 रुपयांच्या पुढे आहे.

Pune Diwali faral
Gram Suraksha System: ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू; आता आपत्कालीन प्रसंगी तातडीने मिळणार मदत

दिवाळीमध्ये खास सीकेपी पद्धतीचे खाज्याचे कानवले बनवणे आमची खासियत आहे. दरवर्षी या कानवल्यांची मागणी जास्त असते आणि साजूक तुपातील कानवल्यांना परदेशातूनही मागणी असते. त्याबरोबरीने भाजणीची खुसखुशीत चकली, साजूक तुपातील बेसन लाडू, रवा लाडू, लसूण शेव, पातळ पोहे चिवडा, खारे-गोड शंकरपाळे अशा फराळाला मागणी असते. यंदाही फराळाला चांगली मागणी आहे. यंदाही परदेशात विविध देशांमध्येही फराळ पाठवत आहोत. फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने फराळाच्या किमतीही वाढवल्या आहेत.

पल्लवी प्रधान, महिला व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news