Pune Diwali Decoration: दिवाळीच्या सजावटीसाठी पुणेकरांची लगबग; एलईडी रोषणाई आणि थीम डेकोरेशनला पसंती

तुळशीबाग, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता अन् कॅम्प परिसरात खरेदीची गर्दी; पारंपरिक पणत्या-तोरणांसोबत रंगीबेरंगी दिवे, वॉल हँगिंग आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याला मागणी
Diwali Decoration
Diwali DecorationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या प्रकाशात घराचा प्रत्येक कोपरा उजळावा, सजावटीतून सणाचा आनंद खुलावा, यासाठी पुणेकरांची सजावटीच्या साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक पणत्या आणि आकाशकंदिलांसोबतच आता रंगबिरंगी एलईडी दिवे, वॉल हँगिंग लाइट्स, पाण्यावर तरंगणारे दिवे, लॅम्प अन् आकर्षक विद्युतरोषणाईच्या माळांना पसंती मिळत आहे. केवळ घर सजविण्यापुरती मर्यादित न राहता यंदा थीमनुसार सजावट करण्याकडेही कल वाढला आहे. फुलांच्या माळा, मोत्यांची तोरणे, रंगीत पडदे, झिरमिळ्या आणि रांगोळी स्टिकर्स, अशा विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या असून, दिवाळीनिमित्त सजावटीच्या साहित्यांच्या खरेदीचा उत्साह बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.

Diwali Decoration
Pune Crime: पुण्यात पत्नीनेच पती आणि त्याच्या मैत्रिणीच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप; १५ लाखांचा कट उघड

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने रविवार पेठेतील बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि कॅम्प परिसरातील सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहे. घराच्या सजावटीसाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यापासून ते रंगसंगती आणि थीमनुसार सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. दिवाळीच्या सजावटीसाठी झेंडूच्या माळा, तोरणे, पणत्या आणि फुलदाण्या, अशा साहित्यांचीही खरेदी होत आहे.

Diwali Decoration
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अविश्वास ठरावाचे साहित्य महामंडळावर सावट; शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीकडे लक्ष

विद्युतरोषणाईला विशेष पसंती

यंदा सजावटीच्या साहित्यामध्ये विद्युतरोषणाईचे विविध प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. एलईडी लाइट्स, विविधरंगी दिवे, लॅम्प, वॉल हँगिंग दिवे, 'हॅप्पी दीपावली' लिहिलेल्या लाइट्स उपलब्ध आहेत. घराच्या प्रवेशद्वारापासून ते बाल्कनी आणि भिंतींपर्यंत रोषणाई करण्यासाठी या साहित्याला पसंती दिली जात आहे. पारंपरिक सजावटीसोबत आधुनिकतेची जोड देण्यासाठी जास्वंद, झेंडू, मोगरा आणि गुलाबाच्या माळा, फुलदाण्या, मोत्यांची तोरणे, राजस्थानी लटकन, रंगबिरंगी पडदे, कागदी फुलांचीही खरेदी होत आहे. 'शुभ दीपावली' आणि 'हॅपी दिवाली'चे स्टिकर्स, रांगोळी स्टिकर्स, शोपीस, फॅन्सी छत्र्या आणि विविध रंगांतील छोटे कंदील हे सजावटीचे पर्यायही खरेदी केले जात आहेत.

Diwali Decoration
Pune Child Custody Case: पुणे जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मुलाचा ताबा मिळवण्यासाठी पित्याचा अर्ज फेटाळला

थीमनुसार सजावटीचा नवा ट्रेंड

यंदा थीमनुसार सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडेही कल दिसून येत आहे. विद्युतरोषणाई, फुलांची सजावट आणि काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृतींवर आधारित सजावटीच्या साहित्याला मागणी आहे. घरे, कार्यालये, संस्था आणि कंपन्यांकडूनही सजावटीच्या साहित्याची खरेदी केली जात आहे. पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्यालाही विशेष पसंती मिळत आहे. कागदी फुले आणि पुनर्वापर करता येणाऱ्या काही सजावटीच्या साहित्यांकडेही कल आहे.

Diwali Decoration
Pune Woman Police Constable: पुण्यात महिला पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत कार चालवताना आढळल्याचा आरोप; निलंबनाची कारवाई होणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही सजावटीच्या साहित्यामध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, यंदा विद्युतरोषणाईचा ट्रेंड अधिक आहे. एलईडी लाइट्स, विविधरंगी दिवे, पाण्यावर तरंगणारे दिवे, अशा विविध प्रकारच्या लाइट्सना पसंती मिळत आहे. थीमनुसार सजावट करण्याबरोबरच दिव्यांच्या आकर्षक मांडणीतून घर सजविण्याकडे कल आहे.

जमीर आत्तार, व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news