Pune Disaster Management Control Room: पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षावर प्रश्नचिन्ह; पूरस्थितीची माहितीच नाही!

अडीचशे कोटींच्या अत्याधुनिक केंद्राकडे पाणी साचलेल्या भागांची तत्काळ माहिती उपलब्ध नसल्याचा खुलासा; पोलिस नियंत्रण कक्षावरच अवलंबून राहण्याची वेळ
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील आपत्तीचे एकाच ठिकाणाहून व्यवस्थापन करता यावे, यासाठी महापालिकेने काही कोटी खर्च करून अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला. मात्र, या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून शहरातील नेमक्या कोणत्या भागात पाणी शिरले, कोणत्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, यासंबंधीची माहिती या कक्षाकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. या सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी पोलिस नियंत्रण कक्ष आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागत असल्याने या केंद्राचा नक्की उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Pune Municipal Corporation
Pune Metro Roof Leak: पुणे मेट्रो स्थानकांमध्ये छतातून पाणी गळती; प्रवाशांचा संताप, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निधीतून पुणे महापालिका भवनात सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. आकर्षक इंटेरिअर, विशाल एलईडी व्हिडीओ वॉल, संगणकयुक्त नियंत्रणव्यवस्था आणि शहरावर २४ तास लक्ष ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. या केंद्रातून शहरातील १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून महत्त्वाचे सर्व रस्ते, चौक इत्यादी ठिकाणी थेट लक्ष देता येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला होता.

Pune Municipal Corporation
Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक खुलासा; प्रियकरासोबत गुप्त विवाह, वेबसीरिज पाहून रचला खुनाचा कट

आता प्रत्यक्षात मात्र या स्क्रीनवर केवळ थेट चित्रण दिसते. एखाद्या घटनेचे जुने फुटेज पाहायचे असल्यास पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांची मदत घ्यावी लागते. तसेच, शहरातील कोणत्या चौकात, रस्त्यावर किंवा सखल भागात पाणी तुंबले आहे, याची माहिती या कक्षाला तत्काळ मिळत नसल्याचे समोर आले आहे.

Pune Municipal Corporation
Alandi Palkhi: आळंदीत पूरस्थिती; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात मोठा बदल, भाविकांना न येण्याचे आवाहन

याचा अनुभव खुद्द महापौर मंजूषा नागपुरे यांनी घेतला. त्यांनी या कक्षाला भेट दिल्यानंतर नदीपात्रातील रस्ता दाखवा, अशी सूचना केली; त्यावर महापालिकेने पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, त्याआधीच महापौरांनी नदीपात्रातील रस्त्यावर पाणी आले असून, हा रस्ता बंद झाल्याची माहिती दिली. तोपर्यंत नियंत्रण कक्षाकडे ही माहितीच नव्हती. त्यामुळे जर आपत्कालीन परिस्थितीची माहिती तत्काळ मिळत नसेल तर या कक्षाचा नक्की उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Pune Municipal Corporation
Changavateshwar Maharaj Palkhi: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी रथासाठी 'सर्जा-राजा' बैलजोडीचा मान जाहीर

धोकादायक ठिकाणांचीही अद्ययावत माहिती नाही

शहरातील पाणी तुंबण्याची शक्यता असलेली ५० धोकादायक ठिकाणे निश्चित केली आहेत. मात्र, त्या ठिकाणांची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे किंवा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत की नाही, याची माहिती या नियंत्रण कक्षाकडे नसल्याचे आढळून आले. ज्या धोकादायक ठिकाणी पाणी शिरले होते, त्याची माहिती या व्यवस्थापन कक्षाला मिळाली नव्हती. दरम्यान, शहरात पाणी साचल्याची माहिती स्वयंचलितपणे मिळावी, यासाठी नवीन प्रणाली (पीएस सिस्टिम) बसविण्याचे काम सुरू असून, पुढील १५ दिवसांत ती कार्यान्वित होईल. तसेच, सीसीटीव्हीचे नियंत्रण पोलिसांकडे असले तरी आवश्यकतेनुसार संबंधित फुटेज तातडीने उपलब्ध करून दिले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news