Pune Metro Roof Leak: पुणे मेट्रो स्थानकांमध्ये छतातून पाणी गळती; प्रवाशांचा संताप, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुसळधार पावसामुळे मेट्रो स्थानकांत पाणी टपकत असल्याची तक्रार; प्रवाशांकडून कायमस्वरूपी दुरुस्तीची जोरदार मागणी
Pune Metro Roof Leak
Pune Metro Roof LeakPudhari
Published on
Updated on

​पुणे: पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रोच्या स्थानकांमध्ये छतातून पाणी गळत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर प्रवाशांनी थेट मेट्रो स्टेशनमधील पाणी गळतीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Pune Metro Roof Leak
Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक खुलासा; प्रियकरासोबत गुप्त विवाह, वेबसीरिज पाहून रचला खुनाचा कट

सुहास सातव नावाच्या एका ट्विटर युझरने सोशल मीडिया पोस्टद्वारे थेट पुणे मेट्रो प्रशासनाकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, सध्या पुण्यातील बहुतांश मेट्रो स्थानकांच्या छतातून पावसाचे पाणी गळत आहे. यामध्ये विशेषतः गजबजलेल्या ''छत्रपती संभाजी महाराज'' मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याचे या प्रवाशाला पहायला मिळाले आहे.

Pune Metro Roof Leak
Alandi Palkhi: आळंदीत पूरस्थिती; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात मोठा बदल, भाविकांना न येण्याचे आवाहन

शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की, प्रवाशांना आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी असलेल्या ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एफसी) गेट्सजवळ आणि परिसरात छतातून पाणी टपकत आहे. हे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाला तिथे चक्क प्लास्टिकच्या बादल्या ठेवाव्या लागल्या आहेत, तर प्रवाशांचा पाय घसरून अपघात होऊ नये म्हणून चेतावणी फलक स्टँड लावावे लागले आहेत. ​पावसाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी मेट्रो प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन छताची गळती थांबवावी आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी," अशी मागणी आता पुणेकरांमधून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news