Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक खुलासा; प्रियकरासोबत गुप्त विवाह, वेबसीरिज पाहून रचला खुनाचा कट

पोलिस तपासात डिजिटल पुरावे, चॅट्स आणि सर्च हिस्ट्रीतून नवे धागेदोरे; लोहगडावरून ढकलून अपघाताचा बनाव रचल्याचा तपासात दावा
Ketan Agarwal Case
Ketan Agarwal CasePudhari
Published on
Updated on

​पुणे: लोहगडावरून ढकलून देऊन केतन अग्रवाल खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात आणखी एक अत्यंत धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

Ketan Agarwal Case
Alandi Palkhi: आळंदीत पूरस्थिती; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात मोठा बदल, भाविकांना न येण्याचे आवाहन

सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच कुटुंबीयांना अंधारात ठेवून गुपचूप विवाह केला होता. राजस्थान येथे फिरायला गेले असताना चेतनने एका मंदिरात सियाच्या भांगेत कुंकू भरून हा गुप्त विवाह उरकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. केतनचा काटा काढण्यासाठी या जोडप्याने अनेक वेबसीरिज, पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांचा सखोल अभ्यास केला होता. गुन्ह्याची वाच्यता होऊ नये आणि पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी देशातील वेगवेगळ्या घटनांची माहिती घेऊन केतनला थेट दरीत ढकलून देण्याचा थरारक कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Ketan Agarwal Case
Changavateshwar Maharaj Palkhi: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी रथासाठी 'सर्जा-राजा' बैलजोडीचा मान जाहीर

​वेबसीरिज आणि पॉडकास्ट पाहून रचला मृत्यूचा सापळा

​लोहगडाच्या कड्यावरून ढकलून देऊन (दि. १८ जून) व्यावसायिक केतन अग्रवाल याचा खून करण्यात आला होता. अटकेत असलेल्या सिया आणि चेतनच्या चौकशीतून दररोज धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील गेल्या सहा ते सात महिन्यांच्या चॅटिंगची आणि सर्च हिस्ट्रीची सखोल पडताळणी केली. ​गुन्हा कसा करावा, पुरावे कसे नष्ट करावेत, यासाठी त्यांनी पॉडकास्ट, व्हिडीओ आणि क्राईम वेबसीरिजचा आधार घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Ketan Agarwal Case
Baramati Police Sub Inspector Case: विवाहितेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा

भारतातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल, याचे नियोजन आरोपींनी केले होते. चाकू किंवा इतर घातक शस्त्रे वापरून खून केल्यास रक्ताचे डाग, फॉरेन्सिक पुरावे सहज मिळू शकतात आणि पोलिस पाळतीवर येऊ शकतात, असा निष्कर्ष आरोपींनी काढला होता. तसेच शस्त्र खरेदी करणे, ते सांभाळणे आणि घटनेनंतर ते लपवणे, यात मोठी जोखीम होती. म्हणूनच, कोणतीही शस्त्रे न वापरता थेट उंच कड्यावरून ढकलून देऊन अपघात दाखवण्याचा निर्णय घेतल्याची कबुली सियाने चौकशीत दिली आहे.

Ketan Agarwal Case
Manchar Fake Milk Case: बनावट दूध रॅकेट प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास टाळाटाळ का?

”माझं डेअरिंग होत नाही; तू पण चल...”

​केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया स्वतः त्याला घेऊन १४ जून रोजी लोहगडावर गेली होती. कड्यावरून ढकलून देण्याचा तिने प्रयत्नही केला. मात्र, ऐनवेळी ती प्रचंड घाबरली आणि तिचा तो प्रयत्न फसला. अपयश आल्यानंतर तिने तत्काळ चेतनशी संपर्क साधला. “माझं डेअरिंग होत नाही, तू पण चल. आपण दोघे मिळून ढकलून देऊ,” असे म्हणत तिने चेतनला लोहगडावर बोलावून घेतले. १८ जून रोजी दोघांनी मिळून केतनला कड्यावरून ढकलून दिले आणि हा केवळ एक अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

​डिजिटल पुराव्यांमुळे आरोपींचा खेळ उघड

या हायप्रोफाइल खून प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, गुन्ह्याच्या वेळचे लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची तपास यंत्रणेकडून कसून पडताळणी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news