Pune Deputy Mayor Office Clash: उपमहापौरांच्या दालनातच हाणामारी; आंबेडकर जयंतीच्या वादातून कार्यकर्ते आमनेसामने

मंडप हटवण्यावरून वाद चिघळला; खुर्च्या फेकत मारहाण, महापालिका परिसरात तणाव
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पुणे: उपमहापौर कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या दालनातच दोन गट आमने-सामने येत खुर्च्या उचलून एकमेकांवर धावून गेले. या घटनेत एका कार्यकर्त्याला शर्ट फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यामुळे उपमहापौरांचे कार्यालयच आता हाणामारीचे ठिकाण बनले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Assault
Pune Stray Dog Sterilization: पुण्यात भटक्या श्वान नसबंदी प्रकल्पाला खीळ; दोन केंद्रे बंद, निधीअभावी अडथळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेकडून एकच मंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी लावलेले बॅनर आणि लहान स्वागत मंडप हटविण्याची कारवाई सुरू आहे. याचदरम्यान पुतळ्याजवळील एक लहान मंडप काढण्यात आल्याने ताडीवाला रस्ता परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.

Assault
Junnar Ambegaon Prant Adhikari: प्रांताधिकारी कार्यालयात 50 हजारांची लाच घेणाऱ्या लिपिकास अटक, प्रांताधिकारीही ताब्यात

याबाबत नाराज कार्यकर्ते तक्रार घेऊन उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे गेले होते. त्या वेळी त्यांच्या दालनात इतर आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच ठिकाणी जयदेव रंधवे नावाच्या एका कार्यकर्त्याने ‌‘तुम्ही वाढीव करायला कशाला आला आहात?‌’ असा सवाल केल्याने वातावरण तापले. या वादातून दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता हाणामारीला सुरुवात झाली.

Assault
Nira Basin Dam: निरा खोऱ्यात धरणे तुडुंब; उन्हाळ्यातही शेतीला पाण्याची चिंता नाही

वाद वाढत जाऊन कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यापर्यंत परिस्थिती बिघडली. तक्रार घेऊन आलेल्या गटातील एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना महापालिकेत बोलावून घेतले. हल्ला करणाऱ्याला ताब्यात देण्याची मागणी करण्यात आल्याने महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनेची गंभीरता लक्षात घेता सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले. दोन्ही गटांमधील वाद मिटविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत उपमहापौरांच्या कार्यालयात बैठक सुरू होती.

Assault
Shirur Gas Cylinder Shortage: शिरूरमध्ये गॅसटंचाईचा फटका; ग्रामीण भागात सिलिंडर गायब, जेजुरीत हॉटेल व्यवसाय धोक्यात

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महापालिकेने एक मंडप काढल्याने काही कार्यकर्ते तक्रार घेऊन माझ्याकडे आले होते. ते ताडीवाला रस्ता भागातील होते. माझ्या दालनात बसलेल्या एका व्यक्तीने त्यांना काहीतरी बोलल्याने त्यांच्यात भांडण झाले. यामागे पूर्वीचे काही वादही कारणीभूत असू शकतात.

परशुराम वाडेकर, उपमहापौर, महापालिका, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news