Shirur Gas Cylinder Shortage: शिरूरमध्ये गॅसटंचाईचा फटका; ग्रामीण भागात सिलिंडर गायब, जेजुरीत हॉटेल व्यवसाय धोक्यात

प्रशासनाचा ‘तुटवडा नाही’ दावा फोल; वितरण कोलमडले, व्यावसायिक गॅसही मिळेना
Shirur Gas Cylinder Shortage:
Shirur Gas Cylinder Shortage:Pudhari
Published on
Updated on

प्रशासन सांगते तुटवडा नाही; मात्र वास्तव वेगळे

निमोणे : शिरूर तालुक्याच्या ग््राामीण भागामध्ये गॅस सिलिंडर वितरणाचा फज्जा उडाला आहे. मागील दहा दिवसांपासून ग््राामीण भागामध्ये गॅस सिलिंडर वितरणाची गाडी फिरकलेली नाही, प्रशासन सांगते कमतरता नाही, मग ग््राामीण भागामध्येच सिलिंडर का मिळत नाही? असा प्रश्न ग््राामीण भागातील जनतेला पडला आहे.

ग््राामीण भागातील गॅस ग््रााहक शिरूर शहरात जाऊन सिलिंडर मिळावा म्हणून तासान्‌‍ तास रांगेत उभा राहतो. मात्र, त्याला रिकाम्या हाताने परत जावे लागते. शहरातील नागरिक पहाटेपासून रांगेत थांबतात. त्यामुळे त्यांना सिलिंडर मिळतो. परंतु, ग््राामीण भागातील व्यक्तीस प्रयत्न करूनही ‌‘त्या‌’ निर्धारित वेळेत पोहोचणे अशक्य झाले आहे.

Shirur Gas Cylinder Shortage:
PNG Gas Pipeline Rules: पीएनजी गॅसला चालना; पाइपलाइनसाठी केंद्राचे नवे नियम लागू

ग््राामीण भागातील वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. दहा दहा दिवस गॅस वितरकाची गाडीच ग््राामीण भागात फिरकत नसल्याने वितरकांच्या दारात चकरा मारण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. ग््राामीण महिलांच्या आरोग्याची काळजी म्हणून मोठा गाजावाजा करत सुरू केलेली उज्ज्वला योजना या टंचाईच्या काळात पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

शिरूर तालुक्याला दररोज किती गॅस सिलिंडर उपलब्ध होतात, त्यातील शहराला किती व ग््राामीण भागाला किती वितरित केल्या जातात याचा लेखाजोखा प्रशासनाने दररोज मांडणे गरजेचे झाले आहे. प्रशासन सांगते सिलिंडर मुबलक आहे, मग ते मिळत का नाहीत? असा प्रश्न निमोण्याचे माजी सरपंच विजय भोस यांनी तालुका प्रशासनाला केला आहे

दरम्यान, शिरूर पुरवठा विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Shirur Gas Cylinder Shortage:
Rupali Thombre On Chakankar Arrest: DNA टेस्टवरून महिलांच्या कुटुंबात वाद... खरात प्रकरणी चाकणकर फॅमिलीचे व्हिडिओ बाहेर आणा

जेजुरीतील हॉटेल व्यावसायिक संकटात

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगरीत भाविकांची वाढती संख्या असतानाही गॅसटंचाईमुळे येथील हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने सुमारे 130 हॉटेल्स, धाबे आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

आखाती देशांतील युद्धपरिस्थितीमुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी व पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. गॅसअभावी हॉटेल व्यावसायिकांना पूर्णक्षमतेने सेवा देणे अशक्य झाले आहे. शासनाने 20 टक्के व्यावसायिक गॅसपुरवठ्याची घोषणा केली असली तरी गेल्या 15 दिवसांत एकही सिलिंडर मिळालेला नाही, अशी माहिती असोसिएशनचे प्रमुख विजय झगडे यांनी दिली. हॉटेल बंद केल्यास कामगार निघून जातील,

Shirur Gas Cylinder Shortage:
Pune Ram Navami: शहरातील मंदिरांमध्ये ‌जय श्री राम‌चा जयघोष

या भीतीमुळे व्यावसायिक अडचणीतूनही हॉटेल सुरू ठेवत आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहे. यावेळी आप्पा बयास, पंकज रहाटेकर, गणेश गाढवे, अक्षय दरेकर, अभिजित कुदळे, धनंजय गोडसे, मल्लु कोळी, योगेश भापकर, अविनाश हरपळे, शब्बीर तांबोळी आदी व्यावसायिकांनी अडचणी मांडल्या. शहीद शंकर शिंदे गॅस एजन्सीचे संचालक सागर शिंदे यांनी 7 मार्चपासून व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याचे सांगितले.

तालुका पुरवठा अधिकारी गोपाळ ठाकरे यांनी सांगितले की, शासनाच्या सूचनेनुसार सध्या घरगुती वापर, रुग्णालये व शैक्षणिक संस्थांना प्राधान्य दिले जात असून, व्यावसायिकांच्या समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जातील. दरम्यान, जेजुरीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news