Pune Dengue Prevention: पुण्यात डेंग्यूचा धोका वाढला; ३,३४८ दूषित कंटेनर, ६०० बांधकाम व्यावसायिकांचे महापालिकेला असहकार्य

२,४१२ घरांत डासोत्पत्तीची ठिकाणे; आरोग्य विभागाच्या तपासणीत धक्कादायक बाबी उघड, नोटिसा आणि दंडात्मक कारवाई करूनही प्रतिबंधक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरात तब्बल ३,३४८ दूषित कंटेनर, २,४१२ घरांमध्ये डासोत्पत्ती ठिकाणे आणि ६०० हून अधिक बांधकाम आस्थापनांनी आरोग्य विभागाला सहकार्य न केल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, यातून महानगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला असून, महापालिकने आता संबंधितांना नोटिसा, तपासण्या आणि दंडात्मक कारवाईचे इशारे दिल्याने यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Municipal Corporation
Pune Dengue Cases 2026: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; कोथरूडमध्ये सर्वाधिक २२९ रुग्ण, चार मलेरिया अधिकाऱ्यांना नोटिसा

महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने सप्टेंबरमध्ये शहरातील ३ लाख ९८ हजार ९३० कंटेनरची तपासणी केली. त्यापैकी ३,३४८ कंटेनर दूषित आढळले. डासोत्पत्ती रोखण्यासाठी ४०२ नोटिसा बजाविण्यात आल्या, तर कारवाईतून १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तपासणी करूनही दूषित कंटेनर आणि डासोत्पत्तीची ठिकाणे आढळत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या परिणाम कारकतेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Pune Municipal Corporation
Ambergris Smuggling Bhor: भोरमध्ये ५ कोटींचे अंबरग्रीस जप्त; व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पाच जण ताब्यात

दरम्यान, याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमबजावणी सुरू केली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. त्यानुसार शहरातील २७ हजार ७५९ घरांमध्ये धूरफवारणी, तर ५३ हजार २१२ घरांमध्ये औषधफवारणी केले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Pune Municipal Corporation
Kondhwa Traffic Congestion: कोंढव्यात वाहतूक कोंडीचा कहर; रात्री साडेदहापर्यंत वाहनांच्या रांगा

महापालिकेने आता या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले

बांधकामांच्या ठिकाणी साचणारे पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरत असल्याने महापालिकेने आता या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागाला सहकार्य न करणाऱ्या ६०० हून अधिक बांधकाम आस्थापनांची यादी बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. प्रथम नोटीस, त्यानंतर डासोत्पत्ती नष्ट करून शुल्कवसुली, अशी कारवाईची पद्धत आहे. शुल्क भरण्यास नकार देणाऱ्यांवर पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Municipal Corporation
Pune Fake College: पुण्यात बोगस महाविद्यालयाचा प्रकार उघड; प्रवेश न घेण्याचे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन

विविध विभागांची समन्वय बैठक घेऊन डेंग्यू प्रतिबंधासाठी उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. मात्र, केवळ बैठका, नोटिसा आणि दंडवसुलीपुरती कारवाई मर्यादित न राहता, बांधकामस्थळांवरील पाणी साचण्याचे प्रकार तातडीने रोखणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई करणे आवश्यक आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जागे होण्याऐवजी महापालिका प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये किती तत्पर आहे, याची कसोटी आता लागणार आहे.

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी गोदामे, पाइपलाइन आणि उघड्यावर ठेवलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचू न देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही गच्चीवरील जुनी टायर, रंगांचे डबे आणि रिकामी भांडी काढून टाकावीत. तसेच, कूलर, फ्रिज आणि वातानुकूलन यंत्रांमध्ये पाणी साचू देऊ नये.

डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news