Pune Dengue Cases 2026: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; कोथरूडमध्ये सर्वाधिक २२९ रुग्ण, चार मलेरिया अधिकाऱ्यांना नोटिसा

सप्टेंबरमध्ये ९५६ डेंग्यू रुग्णांची नोंद; औंध-बाणेरमध्ये चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण, प्रतिबंधात्मक उपाययोजनांतील हलगर्जीपणाबाबत खुलासा मागविला
Dengue
DenguePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, सर्वाधिक २२९ डेंग्यूचे रुग्ण कोथरूडमध्ये आढळले आहेत. त्यापाठोपाठ नगर रस्ता-वडगाव शेरी, औंध-बाणेर आणि धनकवडी या चार भागांत वाढ झाली असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने चार प्रभागांतील मलेरिया अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

Dengue
Ambergris Smuggling Bhor: भोरमध्ये ५ कोटींचे अंबरग्रीस जप्त; व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पाच जण ताब्यात

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरात डेंग्यूचे २,३९१, तर चिकुनगुनियाचे १०६ रुग्ण नोंदविले. पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ९५६ रुग्ण आढळले. जूनमध्ये १६६, जुलैमध्ये ५१८ आणि ऑगस्टमध्ये ७५१ रुग्णांची नोंद झाली.

Dengue
Kondhwa Traffic Congestion: कोंढव्यात वाहतूक कोंडीचा कहर; रात्री साडेदहापर्यंत वाहनांच्या रांगा

नऊ महिन्यांतील एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण एकमेव सप्टेंबरमध्ये आढळले. कोथरूड पाठोपाठ नगर रस्ता-वडगाव शेरीमध्ये २२२, औंध-बाणेरमध्ये २१२, धनकवडी- सहकारनगरमध्ये १३९ आणि येरवडा- कळस- धनोरीमध्ये १३७ डेंग्यू रुग्ण आढळले. चिकुनगुनियाचे सर्वाधिक १९ रुग्ण औंध-बाणेरमध्ये नोंदवले. त्यापैकी १२ रुग्ण एकाच गृहनिर्माण सोसायटीतील आहेत.

Dengue
Pune Fake College: पुण्यात बोगस महाविद्यालयाचा प्रकार उघड; प्रवेश न घेण्याचे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन

औंध-बाणेरमधील पाहणीत महापालिकेच्याच अतिक्रमणविरोधी विभागाच्या गोदामात साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची पैदास होत असल्याचे आढळले. आरोग्य विभागाने गोदाम अधिकाऱ्यांना नोटीस बजावून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. जैविक कीटकनाशकाची फवारणी तसेच बाधित सोसायटीत फवारणी व धुरीकरण केले.

Dengue
Pune Navratri Festival 2026: पुण्यात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय प्रारंभ; देवीदर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

घरोघरी तपासणी करण्याचे निर्देश

प्रादुर्भावग्रस्त भागांत पाच किलोमीटरच्या परिसरात घरोघरी तपासणी, ताप सर्व्हेक्षण, डास उत्पत्तिस्थळांचा शोध आणि फवारणीसह विविध उपाय सलग १५ दिवस राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रुग्णसंख्येत वाढ का झाली, ती रोखण्यासाठी कोणती कारवाई केली आणि संबंधित भागात दररोज कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याचा खुलासा चारही मलेरिया अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आला. त्यांना मुख्यालयात बोलावून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news