Pune Dangerous Wadas Notice: पुण्यातील ३६ अतिधोकादायक वाड्यांना महापालिकेच्या नोटिसा; पावसापूर्वी तातडीने स्थलांतराचे आदेश

मान्सूनपूर्व सर्वेक्षणात जर्जर इमारतींची धोकादायक यादी तयार; जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाची कडक कारवाई
Notice
NoticePudhari
Published on
Updated on

पुणे: मान्सूनच्या तोंडावर शहरातील जुन्या आणि अतिधोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील राहण्यास अयोग्य आणि अत्यंत जर्जर झालेल्या ३६ मिळकतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तत्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकेने रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.

Notice
Mahadbt Seed Distribution: महाडीबीटीवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’; खरीपासाठी प्रमाणित बियाण्यांचे ऑनलाइन वितरण सुरू

पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये ऐतिहासिक आणि जुन्या वाड्यांची संख्या मोठी आहे. मात्र, योग्य देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक वाड्यांची अवस्था दयनीय आणि जर्जर झाली आहे. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणानुसार बांधकाम विभागाने ३६ अतिधोकादायक इमारतींची यादी निश्चित केली आहे. या वाड्यांवर आणि धोकादायक मिळकतींवर महापालिकेच्या वतीने 'धोकादायक' असे मोठे लाल फलक लावले असून, त्या ठिकाणी सूचनापत्रकेही चिकटविण्यात आली आहेत.

Notice
Patas Firing Case: पाटसमध्ये ट्रक लोडिंगच्या वादातून गोळीबार; १८ जणांवर गुन्हा, ९ आरोपी अटकेत

दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही!

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, अतिवृष्टीमध्ये हे वाडे कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २६८ (बी) व (सी) अंतर्गत सर्व संबंधित मालक, भाडेकरू आणि रहिवाशांना तातडीने घरे रिकामी करण्याचे कायदेशीर आदेश देण्यात आले आहेत. नोटीस मिळूनही जे नागरिक तेथेच राहतील, ते स्वतःच्या जबाबदारीवर राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Notice
Pune Nashik Railway Project: पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे ग्रामीण विकासाला मिळणार नवी गती; प्रकल्पाला नागरिकांचा पाठिंबा

दुरुस्तीसाठी 'हे' नियम पाळावेच लागणार

अतिधोकादायक वाड्यांचे पाडकाम करण्याची मोहीम हाती घेतली जात असली तरी ज्या वाड्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या ठिकाणी यूडीसीपीआर कायदा २०२० नुसार काम करावे लागेल. ही दुरुस्ती केवळ परवानाधारक वास्तूविशारद किंवा मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनीअर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली करणे बंधनकारक आहे.

Notice
Maharashtra Government Corruption Complaints: ‘पैशांशिवाय कामच होत नाही’; सरकारी यंत्रणेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

मध्यवर्ती पेठांमध्ये दर वर्षी धाकधूक!

शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, कसबा आणि रास्ता पेठ या भागांत सर्वाधिक जुने वाडे आहेत. पावसाळ्यात भिंती खचणे, छप्पर कोसळणे अशा घटना दरवर्षी घडतात. म्हणूनच, कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने यंदा आधीच ३६ मिळकती रिकाम्या करण्याची मोहीम तीव्र केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news