Patas Firing Case: पाटसमध्ये ट्रक लोडिंगच्या वादातून गोळीबार; १८ जणांवर गुन्हा, ९ आरोपी अटकेत

श्री सिमेंट कंपनीतील ट्रकमध्ये सिमेंट भरण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने; हाणामारी, दगडफेक आणि गोळीबारानंतर यवत पोलिसांची कारवाई
Gun Firing
Gun FiringPudhari
Published on
Updated on

पाटस: पाटस (ता. दौंड) येथील गरदडे कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (दि. ५) दुपारी झालेली हाणामारी, दगडफेक आणि गोळीबारप्रकरणी यवत पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून, पोलिसांनी अठरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Gun Firing
Pune Nashik Railway Project: पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे ग्रामीण विकासाला मिळणार नवी गती; प्रकल्पाला नागरिकांचा पाठिंबा

श्री सिमेंट कंपनीत ट्रकमध्ये सिमेंट भरण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याने त्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.

Gun Firing
Maharashtra Government Corruption Complaints: ‘पैशांशिवाय कामच होत नाही’; सरकारी यंत्रणेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक संतोष बाळकृष्ण कडू (वय ४१, रा. बेटवाडी, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्ससमोर सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी चर्चा सुरू असताना सूरज राजेंद्र कुऱ्हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण व इतर ३ जणांनी संतोष कडू यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी अजय धोत्रे याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यानुसार यवत पोलिसांनी गुन्हा दाखल करत सूरज कुऱ्हाडकर, अजय धोत्रे आणि अनिल चव्हाण यांना अटक केली आहे.

Gun Firing
Kesnand Fake Revenue Order Case: केसनंद बनावट महसूल आदेश प्रकरण; चौकशीत मोठे गौप्यस्फोट होण्याची चर्चा

सूरज राजेंद्र कुऱ्हाडकर (वय ३२, रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड), यांनीही स्वतंत्र फिर्याद दिली आहे. त्यामध्ये संतोष कडू व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून गज व दगडांच्या साहाय्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सूरज कुऱ्हाडकर व साक्षीदारांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचे तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Gun Firing
Maharashtra Tobacco Government Offices: जुन्नरच्या शासकीय कार्यालयांत तंबाखूच्या पिचकाऱ्यांचा सुळसुळाट; स्वच्छतेच्या दाव्यांना तडा

याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संतोष कडू, अण्णा बाबू गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर आण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती, ढोकराई फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news