Pune Cyber Fraud: पुण्यात शेअर मार्केटच्या आमिषाने 452 कोटींची फसवणूक; 982 जण जाळ्यात

सायबर ठगांचा वाढता कहर; सुशिक्षित नागरिकही बळी, पोलिसांचा इशारा
Share Trading Scam
Share Trading ScamPudhari
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे: सायबर ठगांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत पुण्यातील नागरिकांना तब्बल 452 कोटी रुपयांना आर्थिक गंडा घातला आहे. सव्वादोन वर्षांत 982 पुणेकर ठगांच्या जाळ्यात अडकले असून, त्यामध्ये डॉक्टर, सेवानिवृत्त वकील, आयटी अभियंता, शिक्षक यांच्यासारख्या सुशिक्षित लोकांचा समावेश आहे.

Share Trading Scam
Saswad Khanwadi Road Condition: सासवड-खानवडी रस्ता खड्डेमय; पंचायत समिती सभेत प्रशासनावर जोरदार टीका

सायबर पोलिस आणि शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, अवघ्या 27 महिन्यांत (2024 ते एप्रिल 2026) तब्बल 982 गुन्हे दाखल झाले असून, एकूण 452 कोटी 2 लाख 89 हजार 862 रुपयांची फसवणूक झाली आहे, तर दुसरीकडे बदनामी, किंवा घरच्यांना कळेल म्हणून अनेक व्यक्ती फसवणूक झाल्यानंतर देखील पुढे येत नाहीत. त्यामुळे हा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सर्वात गंभीर म्हणजे पोलिसांनी अशा फसव्या योजनांपासून दूर राहण्याचे आवाहन केल्यानंतर देखील नागरिक मोठ्या प्रमाणात सायबर ठगांच्या जाळ्यात अडकत असल्याचे वास्तव आहे.

Share Trading Scam
Indapur Painted stork: इंदापूरमध्ये चित्रबलाक पक्ष्यांचे स्थायिक वास्तव्य; उजनी परिसर गजबजला

सायबर पोलिस ठाण्यांत 246 गुन्ह्यांत तब्बल 312 कोटी 55 लाख 104 रुपयांची फसवणूक नोंदली गेली आहे, तर इतर पोलिस ठाण्यांमध्ये 736 गुन्ह्यांत 139 कोटी 47 लाख 86 हजार 880 रुपयांची फसवणूक झाली आहे. यावरून मोठ्या रकमेचे गुन्हे सायबर पोलिसांकडे, तर छोट्या-मोठ्या फसवणुकीचे गुन्हे स्थानिक पोलिस ठाण्यांत अधिक प्रमाणात दाखल होत असल्याचे निदर्शनास येते. 455 दिवसांत 452 कोटी 2 लाखांची फसवणूक, तर दिवसाला पुणेकरांना शेअर मार्केच्या बहाण्याने 99 लाख 34 हजारांचा गंडा घातला गेल्याचे आकड्यांवरून स्षष्ट होत आहे.

Share Trading Scam
Pune Water Storage Dams: पुणे जिल्ह्यात धरणांतील पाणीसाठा मिश्र; कुठे दिलासा तर कुठे टंचाईची भीती

ट्रेंड काय सांगतो?

2024 मध्ये सायबर पोलिसांकडे 130 गुन्ह्यांत सुमारे 140 कोटी, तर इतर ठाण्यांत 291 गुन्ह्यांत 57 कोटींची फसवणूक झाली. 2025 मध्ये सायबरकडे 84 गुन्ह्यांत 100 कोटी, तर इतर ठाण्यांत 341 गुन्ह्यांत 61 कोटींची नोंद झाली. 2026 मध्ये (एप्रिलपर्यंत) सायबर पोलिसांकडे 32 गुन्ह्यांत 71 कोटी, तर स्थानिक ठाण्यांत 104 गुन्ह्यांत 20 कोटींची फसवणूक झाली आहे. यावरून फसवणुकीचा आकडा सातत्याने वाढत असून, गुन्हेगारांनी डिजिटल माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे जाळे अधिक बळकट केल्याचे दिसून येते.

Share Trading Scam
Pune Railway Coaching Depot: म्हातोबाची आळंदी येथे रेल्वे कोचिंग डेपो; पुणे विभागाची मोठी योजना

अशी आहे मोडस ऑपरेंडी

  • ‌‘प्रॉफिट‌’चे आमिष दाखवणाऱ्या ॲपद्वारे सुरुवातीला छोटा नफा दाखवून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवायला लावून ॲप बंद करून आरोपी गायब होतात.

  • ‌‘सेबी नोंदणीकृत‌’ असल्याचे भासवून फोनद्वारे संपर्क साधला जातो. फिशिंग लिंकच्या माध्यमातून ओटीपी मिळवून खात्यातील पैसे काढून घेतले जातात.

  • टेलिग््रााम किंवा व्हॉट्‌‍सॲप ग््रुापवर ‌‘गॅरंटेड रिटर्न‌’चे आमिष दाखवले जाते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतल्यानंतर गुंतवणूकदाराला ॲपमध्ये नफा मिळत असल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात तो जेव्हा पैसे काढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला विविध कारणे सांगून आणखी पैसे उकळले जाता. प्रत्यक्षात मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news