निमोणे: शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणात सध्या 1.33 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एप्रिलअखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात लाभक्षेत्रासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती घोड शाखेचे अभियंता वैभव काळे यांनी दिली.
कुकडी प्रकल्पातील पहिले माती धरण असलेल्या या धरणाच्या निर्मितीच्या वेळी साठवणक्षमता सुमारे साडेसात टीएमसी होती. मात्र, कालांतराने मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे धरणाची साठवणक्षमता घटल्याचा निष्कर्ष नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेने काढला आहे. सध्या धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर उपयुक्त पाणीसाठा सुमारे साडेपाच टीएमसी इतकाच राहतो. मार्च महिन्यात दोन्ही कालव्यांना पूर्णक्षमतेने आवर्तन सोडण्यात आले होते तसेच नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडल्यामुळे सध्या लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई जाणवत नाही. उपलब्ध 1.33 टीएमसी पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर उन्हाळी आवर्तनाचे अंतिम नियोजन केले जाणार आहे. धरणाचा मूर्त साठा 1.10 टीएमसी असून, याच साठ्यावर आगामी काळात रांजणगाव औद्योगिक वसाहत, दोन्ही तालुक्यांतील प्रमुख शहरे व गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच बॅकवॉटरमधील सिंचन योजना सुरू राहणार आहेत. जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार धरणातील उपयुक्त पाणीसाठा मेअखेरपर्यंत वापरणे आवश्यक असल्याने एप्रिल अखेरपर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.

नाझरे धरणात सध्या 36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या 43 गावांना त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळणार आहे. या गावातील ग््राामस्थांना उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण यावर्षी करावी लागणार नाही. नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता ही पाऊण टीएमसी आहे. पुरंदर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 496 मिलिमीटर आहे. गतवर्षी सरासरी पेक्षा दुप्पट पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. या धरणावर जेजुरी, जेजुरी औद्योगिक वसाहत, बारामती तालुक्यातील मोरगाव व सोळा गावे, माळशिरस-पारगाव योजना, पांडेश्वर-मावडी योजना यातून 43 गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. सुमारे एक हजार हेक्टर शेती हंगामी स्वरूपात ओलिताखाली येते.
नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट आहे. मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आजपर्यंत धरणात 425 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठा वगळता सुमारे 36 टक्के पिण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध आहे. हे पाणी ऑगस्ट अखेर पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे अशी माहिती नाझरे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी दिली. धरणातून जेजुरी एमआयडीसी, जेजुरी शहर, मोरगाव व 16 गावे, नाझरे व पाच गावे तसेच कोळविहिरे योजनेला पिण्याचे पाणी दिले जाते. तसेच शेतीला हंगामी स्वरूपात पाणी दिले जाते. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने उन्हाळी पिकांसाठी आवर्तन देण्यात येत आहे. कालवा व उपसा सिंचनद्वारे 200 हेक्टर शेती त्यामुळे ओलिताखाली आली आहे.
किल्ले पुरंदर परिसरातील महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या घोरवडी धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला असून, सध्या केवळ 20 टक्के पाणी शिल्लक आहे. वाढते तापमान, वाढता पाण्याचा वापर आणि सुरू असलेली पाणी चोरी यामुळे आगामी काळात तीव पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. घोरवडी धरणाची एकूण साठवण क्षमता 67.50 दशलक्ष घनफूट असून, सध्या पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याची माहिती पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी दिली. या धरणातून दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे दिवे, पवारवाडी, काळेवाडी, झेंडेवाडी तसेच सुपे-घोरवडी परिसरातील शिवतारेवस्ती, चव्हाणवस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा या भागांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच सुमारे 55 हेक्टर क्षेत्राचे सिंचन या धरणावर अवलंबून आहे.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने धरणात चांगला साठा उपलब्ध होता आणि जूनपर्यंत टंचाई भासणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सध्याची घसरती पातळी चिंतेचा विषय ठरत असून, सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनीही धरणात केवळ 20 टक्के पाणी उरल्याची पुष्टी दिली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी उचल परवान्याची मुदत 28 फेबुवारीला संपली असतानाही काही ठिकाणी वीज पंपांच्या साहाय्याने बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून असे पंप जप्त करावेत, अशी मागणी सुपे परिसरातील ग््राामस्थांनी केली आहे. सध्या सासवड शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू असला तरी साठ्यात घट होत असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.