

जावेद मुलाणी
इंदापूर: पावसाळ्याच्या प्रारंभी जून महिन्यात हे पक्षी आपल्या नव्या पिढीसह पुन्हा कच्छच्या रणाकडे व सैबेरियाकडे परततात. मात्र, इंदापूरच्या अनुकूल वातावरणामुळे गेल्या काही वर्षांत काही चित्रबलाक पक्षी येथेच कायमस्वरूपी वास्तव्यास राहू लागले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये या पक्ष्यांविषयी विशेष आपुलकी निर्माण झाली आहे.
चिंचेची झाडे हे त्यांचे ‘हक्काचे घर’ बनले असून, एखादे पिलू खाली पडल्यास नागरिक तत्काळ पोलिस, वन विभाग, इंदापूर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग किंवा निमगाव केतकी येथील ‘फेंड्स ऑफ नेचर क्लब’च्या सदस्यांशी संपर्क साधून त्यावर उपचार करतात.
दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडी वाढली की चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशय परिसरात होते. सहा महिन्यांच्या कालावधीत या पक्ष्यांच्या गजबजाटाने परिसर खुलून जातो. त्यांच्या विणीच्या वसाहतीला सारंगार असे म्हटले जाते. सध्या पिलांना उड्डाणाचे प्रशिक्षण सुरू असून, आकाशातील त्यांच्या सुंदर कवायती पाहणे हा इंदापूरकरांचा नित्यक्रम झाला आहे.
अधिवास जपणे गरजेचे
विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येत आहेत. तसेच, गैरसमजुतीमुळेही पक्ष्यांच्या वसाहती नष्ट होत आहेत. भादलवाडीतील सारंगारांसह अशा अधिवासांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे पक्षिअभ्यासक राहुल लोणकर यांनी सांगितले.
चित्रबलाक पक्ष्यांची वैशिष्ट्ये
चित्रबलाक (झरळपींशव डेीींज्ञ) हा करकोचा जातीतील आकर्षक पक्षी असून, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश व म्यानमारमध्ये आढळतो. साधारण गिधाडाएवढा आकार, 95 ते 100 सेंमी उंची आणि 150 ते 160 सेंमी पंखांची लांबी असते. पिवळी, लांब व किंचित वाकडी चोच, पांढरे शरीर, गुलाबी पंख आणि काळ्या खुणा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.