Pune Cyber Fraud: पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; हॉटेल बुकिंग, क्रेडिट कार्ड व गुंतवणुकीत लाखोंची फसवणूक

शिवाजीनगर, हडपसर व लोणीकंद पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल; ऑनलाईन लिंक व व्हिडिओ कॉलद्वारे खात्यातून रक्कम लंपास
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पुणे: नाशिकमधील हॉटेलची रूम बुक करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी महिलेची सात लाख 23 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे.

Cyber Fraud
Pune Riverfront Project: मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; वाकड-सांगवी टप्प्यावरून नागरिकांचा सवाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 53 वर्षीय महिला शिवाजीनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ऑनलाईन हॉटेल बुकिंग सेवा देणाऱ्या संकेतस्थळातून बोलत असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी महिलेकडे केली. नाशिकमधील हॉटलेमध्ये बुक केलेली खोलीची तारीख बदलतो, अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली.

Cyber Fraud
Smart Meter MSEDCL: स्मार्ट/ टीओडी मीटर बसवा आणि दिवसा वीजवापरावर 80 पैसे सवलत मिळवा

त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. महिलेच्या मोबाईल ॲक्सेस आपल्या ताब्यात घेऊन तिच्या बँक खात्यातून परस्पर सात लाख 23 हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्य्‌ा‍चे उघडकीस आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमर काळंगे तपास करीत आहेत.

Cyber Fraud
Pune crime: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्‍याचार

क्रेडिट कार्डच्या आमिषाने दोन लाखांचा गंडा

क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची दोन लाख 16 हजार 393 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी त्यांना एका नामांकित बँकेचे क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखविले. चोरट्यांनी त्यांना एक लिंक उघडण्यास सांगितले. लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख 16 हजार रुपये लांबवले.

Cyber Fraud
Pune Youths Gujarat Accident: गुजरातमध्ये भीषण अपघात; पुण्यातील तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तीन लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गु्‌‍न्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांक व एक लिंक पाठविली. गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी तीन लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news