Child Assault Case Crime
Child Assault Case CrimePudhari

Pune crime: शाळकरी मुलीवर लैंगिक अत्‍याचार

वारजे माळवाडी पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
Published on

पुणे : शाळेत सोडण्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर कारमध्येच लैंगिक अत्‍याचार केल्‍याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीतील आहे. ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर (वय २९, रा. पोळ काॅलनी, आपटे सोसायटी रस्ता, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Child Assault Case Crime
Pune Crime: पुणे पोलिसांनी उधळला खुनाचा डाव, पिस्तुलासह सुपारी घेणाऱ्याला बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीचा आहे. त्याची पीडित मुलीच्या आईशी ओळख होती. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास अल्पवयीन मुलीला कारमधून शाळेत सोडतो, असे सांगून तिला आरोपीने नेले. कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर त्याने कार थांबविली. कारमध्ये त्याने मुलीला धमकावून अत्‍याचार केला.

Child Assault Case Crime
Pune Crime: एकतर्फी प्रेमातून दुहेरी खून; नराधम अटकेत

हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक तरडे तपास करीत आहेत.

Child Assault Case Crime
Pune Crime: पुणे हादरले! पती-पत्नीचा वाद झाला अन् आईने पोटच्या मुलाचा जीव घेतला

विवाहाच्या आमिषाने अत्‍याचार

विवाहाच्या आमिषाने एका तरुणीवर लैंगिक अत्‍याचार करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी बादशाह मशाक लाडलेकर (वय २७, रा. साडेसतरा नळी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अब्दागिरे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news