Pune Youths Gujarat Accident: गुजरातमध्ये भीषण अपघात; पुण्यातील तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

बारा ज्योतिर्लिंग दर्शनावरून परतताना दाहोद जिल्ह्यात SUV दुभाजकावर आदळली; कार 20 फूट खोल शेतात कोसळली
India Road Accident
Road AccidentFile Photo
Published on
Updated on

पुणे / मांजरी : पुण्यातून बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा गुजरातमध्ये दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील धाधेला वळणावर सोमवार (ता.16) रोजी पहाटे 2 च्या सुमारास रस्ता अपघातात मृत्यू झाला. तेजस दगडे, अभिषेक यादव आणि सचिन बिराजदार असे तिघांची नाव आहे. तीन जीवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

India Road Accident
Third Ratoon Sugarcane Registration: तिसऱ्या खोडव्याला साखर कारखान्यांनी अडथळा करू नये; साखर आयुक्तांचे स्पष्ट निर्देश

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र नोंदणीकृत एसयूव्ही गाडी नियंत्रण गमावून महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. या धडकेत गाडीचा चुरडा झाला. कारचे इंजिन 50 फूट दूर फेकले गेले. एसयूव्ही रस्त्यावरून उलटून जवळच्या शेतात 20 फूट खोलवर कोसळली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघेही 15 दिवसांपूर्वी बारा ज्योर्तिलिंगाच्या दर्शनासाठी गेले होते.

India Road Accident
Bhor Municipal Corporation: भोर पालिकेचा अर्थसंकल्प वादात रखडला

खासगी गाडीने ते या प्रवासासाठी गेले असताना हा अपघात झाला. तेजस दगडे हा मांजरी परिसरातील रहिवासी होता. शेतीबरोबरच त्याचे कार्यालयाचा व्यवसाय होता. सोमवारी त्याच्या अपघाताची बातमी गुजरात पोलिसांकडून तेजसच्या घरच्यांना समजली. त्यानंतर त्यांनी लागलीची गुजरातकडे धाव घेतली. तेजसवर बुधवारी मांजरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news