Pune Cultural Events: पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी; दिवाळीपासून फेब्रुवारीपर्यंत रंगणार महोत्सव

डिसेंबरमध्ये पुणे पुस्तक महोत्सव, जानेवारीत सवाई गंधर्व, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि शंभरावे मराठी साहित्य संमेलन
Cultural Events
Cultural EventsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळी पहाटच्या सुरेल मैफली, नव्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग, प्रायोगिक रंगभूमीवरील वेगळे विषय आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी-महोत्सवांनी पुण्यातील सांस्कृतिक सीझन रंगणार आहे. नवरात्रोत्सवापासून सुरू झालेली ही सांस्कृतिक पर्वणी फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, अनेक कार्यक्रमांसाठी आतापासूनच आगाऊ बुकिंग होत आहे. डिसेंबरमध्ये पुणे पुस्तक महोत्सव, तर जानेवारीत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, असे महत्त्वाचे सोहळे रंगणार आहेत. त्यामुळे पुढील चार महिने पुणेकरांना नाटक, संगीत, साहित्य आणि चित्रपटांची मेजवानी अनुभवता येणार आहे.

Cultural Events
Rana Suryavanshi Security: राणा सूर्यवंशींच्या वाय प्लस सुरक्षेवरून पोलीस महासंचालकांची अधिकाऱ्यांना तंबी

पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम होत असले, तरी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ विशेष गजबजलेला असतो. सध्या विविध ठिकाणी संगीत मैफली, व्याख्याने, साहित्यिक चर्चा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम रंगणार असून, नव्या नाटकांचे प्रयोगही प्रेक्षकांसमोर सादर होणार आहेत. त्यासाठीची तयारी सुरु झाली असून, नाट्यगृहांचे बुकिंग झाले आहेच. त्याशिवाय तिकीट विक्रीही सुरू झाली आहे. सुट्ट्यांचा काळ, प्रेक्षकांची उपलब्धता आणि महोत्सवांचे वेळापत्रक लक्षात घेऊन आयोजक, निर्माते आणि सांस्कृतिक संस्था कार्यक्रमांचे नियोजन करत आहेत.

Cultural Events
Pune Diwali Traffic: दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात गर्दी; मध्यवर्ती बाजारपेठांत वाहतूक कोंडी

दिवाळीनंतरचा काळ मराठी व्यावसायिक रंगभूमीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कौटुंबिक, विनोदी, सामाजिक आणि रहस्यप्रधान नाटकांचे नवे प्रयोग, जुन्या नाटकांचे वाढीव प्रयोग तसेच कलाकारांचे दौरे यांची तयारी सुरू आहे. नाट्यगृहांचे आगाऊ आरक्षणही केले जात आहे. दुसरीकडे, प्रायोगिक रंगभूमीवर सामाजिक प्रश्न, मानवी नातेसंबंध, बदलती जीवनशैली आणि व्यक्तीच्या मानसिकतेचा वेध घेणाऱ्या कलाकृती सादर होणार आहेत. एकपात्री प्रयोग, अभिवाचन, नाट्यवाचन आणि चर्चासत्रांनाही या काळात व्यासपीठ मिळणार आहे. याविषयी संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, नोव्हेंबर ते जानेवारी कलाकारांसाठी महत्त्वाचा काळ असतो. चित्रपट महोत्सवांपासून शाळांच्या स्नेहसंमेलनांपर्यंतचे कार्यक्रम रंगतात. नवरात्रोत्सवापासून या सीझनला सुरुवात झाली आहे. कलाकार ठिकठिकाणच्या दौऱ्यांचेही नियोजन करत आहेत. आम्हीही कार्यक्रमांच्या नियोजनाला सुरुवात केली आहे.

Cultural Events
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचे २,२९१ रुग्ण; महापालिका प्रशासन अलर्ट

डिसेंबर-जानेवारीत महोत्सवांची पर्वणी

डिसेंबरमध्ये पुणे पुस्तक महोत्सव, तर जानेवारीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणखी वाढेल. ७२ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १३ ते १७ जानेवारीदरम्यान फर्ग्युसनच्या मैदानावर होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ ते २१ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. त्यानंतर २८ ते ३१ जानेवारीपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपर्यंत नाटकांचे प्रयोग, कलाकारांचे दौरे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांची लगबग सुरू राहणार आहे.

Cultural Events
Someshwar Sugar Factory: 'सोमेश्वर'च्या सभासद शेतकरी आणि कामगारांची दिवाळी गोड; ऊस उत्पादकांना ६०.११ कोटींचे वितरण

दिवाळी पहाटच्या मैफली, नवीन व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटके यांमुळे पुढील काही महिने रंगभूमी आणि संगीत क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. नोव्हेंबरमध्ये नव्या नाटकांचे प्रयोग पाहायला मिळतील. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कार्यक्रम आणि महोत्सवांचा हंगाम असतो. या काळात कलाकारांचे दौरेही विविध ठिकाणी होतात. कलाकार आणि सांस्कृतिक संस्था या कार्यक्रमांसाठी तयारी करत आहेत.

सत्यजित धांडेकर, नाट्यनिर्माते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news