file photo
पुणे
Pune Crime News : जाब विचारल्याने तरुणावर हल्ला
पुणे : मैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमर बसवराज जमादार ( वय 20, रा. महादेवनगर, गोपाळपट्टी, मांजरी ), अमन अशोक नरोटे (वय 19, रा. काळेपडळ, हडपसर ), श्रीपती संतोष सरोदे ( वय 19, रा. साडेसतरा नळी, हडपसर ), श्रीपती सरोदे याचा मित्र (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अमोल राजाराम घाटे ( वय 25, सर्वे नं. 165, माळवाडी, हडपसर मूळ पत्ता भिलवडी, जिल्हा नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा

