जगातील पहिल्या चिकुनगुनिया लसीला अमेरिकेत मंजुरी

जगातील पहिल्या चिकुनगुनिया लसीला अमेरिकेत मंजुरी

वॉशिंग्टन : चिकुनगुनियापासून बचाव होण्यासाठीच्या जगातील पहिल्या लसीला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. फ्रेंच बायोटेक कंपनी 'वालनेवा'कडून ही लस विकसित करण्यात आली आहे. तिला 'इक्सचिक' असे नाव देण्यात आले आहे.

चिकुनगुनियाचा विषाणू हा प्रामुख्याने संक्रमित डासांच्या दंशामुळे मानवात फैलावतो. गेल्या 15 वर्षांमध्ये 50 लाख रुग्णांमध्ये चिकुनगुनियाची पुष्टी झाल्याने हा आजार आता जागतिक आरोग्यासाठी धोकादायक बनला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या लसीला मंजुरी दिली आहे. ही लस अठरा व त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना दिली जाऊ शकेल असे 'एफडीए'ने म्हटले आहे. 'इक्सचिक'चा एकच डोस इंजेक्शनच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो. या लसीमध्ये चिकुनगुनियाच्या विषाणूचे जिवंत, पण कमजोर रूप असते.त्यामुळे लस घेतल्यावर व्यक्तीमध्ये चिकुनगुनियाची लक्षणे निर्माण होतात.

कंपनीने उत्तर अमेरिकेत 3500 लोकांवर या लसीची चाचणी घेतली. लस घेतल्यानंतर लोकांना डोकेदुखी, थकवा, सांधेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, ताप आणि मळमळणे अशी लक्षणे दिसून आली. या लसीमुळे शरीरात चिकुनगुनियाविरुद्ध प्रतीकारक शक्ती निर्माण होते. 'एफडीए'च्या सेंटर फॉर बायोलॉजिक्स इवेल्युशमन अँड रिसर्चचे संचालक पीटर मार्क्स यांनी म्हटले आहे की चिकुनगुनिया विषाणूच्या संक्रमणामुळे घातक आजार आणि दीर्घकाळापर्यंत आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. चिकुनगुनिया नवजात बाळांसाठीही घातक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news