पुणे : पत्‍नीच्‍या नातेवाईकांनी केला पतीचा खून

Murder: file photo
Murder: file photo

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा   मारहाण करणार्‍या पतीचा पत्‍नीच्‍या नातेवाईकांनी खून केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. आकाश अशोक गोरखे ( वय २८, रा. दत्त मंदिरामागे, शिवाजीनगर, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोनी उमेश जेगरे ( वय ३१ ), ज्योती अक्षय गोरखे ( वय १९, दोघे रा. दत्त मंदिराच्या मागे, शिवाजीनगर ), रवि धनु राठोड (मोरे सायकल स्टँड च्या मागे, राजीव गांधी नगर ), अक्षय लोंढे ( रा. जाधव वाडी चिखली ), राम विजय महोतो (रा. पटना बिहार ) आणि साहिल ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) अशी अटक केलेल्‍या संशयित आरोपींची नावे आहेत.

आकाश आपली पत्नी ज्योती हिला रोज मारहाण करीत असे. त्याचा नातेवाईकांना राग होता. ३० जानेवारी रोजी अक्षय राम साहिल व रवी यांनी आकाश याला सोबत नेले होते. देहूगाव कमानीपासून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. यांनी त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पाेलिस तपासात स्‍पष्‍ट झाले.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news