IPL Auction : जोफ्रा आर्चरसाठी मुंबई इंडियन्‍सची आठ कोटींची बोली | पुढारी

IPL Auction : जोफ्रा आर्चरसाठी मुंबई इंडियन्‍सची आठ कोटींची बोली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

आयपीएलच्‍या मागील सीझनमध्‍ये राजस्‍थान रॉयल्‍सच्‍या ताफ्‍यात असणारा इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला यंदा मुंबई इंडियन्‍सने तगडी बोली लावत आपल्‍या संघात घेतले. आज लिलवात राजस्‍थानेही जोफ्रा आपल्‍याच संघात राहण्‍यासाठी बोली वाढवत नेली. अखेर अंबानींनी बाजी मारत जोफ्रासाठी ८ कोटींची बोली लावली. आता मुंबईच्‍या ताफ्‍यात जसप्रित बुमराह बरोबरच जोफ्रा सारखा तगडा वेगवान गोलंदाज असणार आहे.

रविवारी सायंकाळपर्यंत १५३ खेळाडूंवर बोली लागली आहे. सिंगापूरमध्‍ये जन्‍म झालेला ऑस्‍ट्रेलियाचा फलंदाज टिम डेव्‍हिड याला मुंबई इंडियन्‍सने ८.२५ कोटी रुपये मोजत आपल्‍या संघात घेतले. वेस्‍टइंडिजचा वेगवान गोलंदजा ऑबेड मेकॉय याला राजस्‍थान रॉयल्‍सने ७५ लाख रुपयांना खरेदी केले आहे. तर ऑस्‍ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फ याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७५ लाखांची बोली लावली.

इंग्‍लंडचा लायम लिविंगस्‍टोन ठरला महागडा विदेश खेळाडू

इंडियन प्रीमिअर  लीगच्‍या (आयपीएल) महालिलाव ( IPL Auction ) आज दुसर्‍या दिवशी सुरु झाला असून इंग्‍लंडचा लायम लिविंगस्‍टोन ठरला महागडा विदेश खेळाडू ठरला आहे.  लायम लिविंगस्‍टोन यासाठी पंजाब किंग्‍जने तब्‍बल ११.५० कोटी रुपये मोजले. दुसर्‍या दिवशीच्‍या आतापर्यंतच्‍या लिलावात तो सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. मागील सीझनमध्‍ये सनरायझर्स हैदराबादने लयामवर २ कोटींची बोली लावली होती.  पहिल्‍या दिवशी ९७ तर दुसर्‍या दिवशी ४५ खेळाडूंचा लिलाव झाला. १० संघांनी आतापर्यंत ९६ खेळाडूंवर बोली लावली. पहिल्‍या दिवशी ७४ खेळाडूंचा संघ निश्‍चित झाला होता.

ऑस्‍ट्रेलियाच्‍या बिग बॅश लीगमध्‍ये सर्वाधिक धावा करणार्‍या बीन मॅकटरमोट यालाही कोणी पसंती दिली नाही. सेच न्‍यूझीलंडचा ग्‍लेन फिलिप्‍स याच्‍याही पाटी कोरीच राहिली आहे.

शाहरुख खान पुन्‍हा प्रिती झिंटाच्‍या  संघात

तामिळनाडूचा धडाकेबाज फलंदाज शाहरुख खान याला प्रिती झिंटाच्‍या पंजाब किंग्‍जने दुसर्‍यांदा त्‍याला आपल्‍या संघात स्‍थान दिले. तिने शाहरुख खानला तब्‍बल ९ कोटी रुपयांना खरेदी केले. तर राहुल तेवतिया याच्‍यावर गुजरात टाइटंसने ९ कोटी रुपयांची बाेली लावली.

शाहरुख खानला मागील वर्षी प्रीत झिंटाच्‍या पंजाब किंग्‍स संघाने ५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. विजय हजारे ट्रॉफीमध्‍ये शाहरुख खानने सर्वात्‍कृष्‍ट प्रदर्शन केले. यामुळे त्‍याच्‍यावर पंजाब किंग्‍सने ९ कोटींची बोली लावली. मागील वर्षी राजस्‍थान रॉयल्‍सकडून खेळणार्‍या राहुल तेवतिया यंदा गुजरात टाइटन्‍सने ९ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

शाहरुख खान याने विजय हजारे ट्रॉफीमध्‍ये आठ सामने खेळले. यातील सात डावांमध्‍ये २५३ धावा फटकावल्‍या. यामध्‍ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. मागील वर्षीही पंजाब किंग्‍सकडून खेळताना शाहरुख खानच्‍या फलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवली होती. यापूर्वी त्‍याने सय्‍यद मुश्‍ताक अली टी-२० स्‍पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती.

IPL Auction :राहुल तेवतियानेही केली ‘छप्‍पर फाडके’ कमाई

फिरकी गोलंदाज आणि फलंदाज राहुल तेवतिया याची बेसिक प्राइस ४० लाख होती. आज त्‍याच्‍यावर बंगळूर, चेन्‍नई आणि गुजरातने जोरदार बोली लावली. अखेर गुजरात टायटन्‍सने त्‍याला ९ कोटी रुपयांना रेदी केले. आयपीएलच्‍या मागील सीजनमध्‍ये तेवतिया हा राजस्‍थान रॉयल्‍सकडून खेळला यावेळी त्‍याला तीन कोटी रुपये मिळाले होते. आतापर्यंत त्‍याने आयपीएलमध्‍ये ४८ सामने खेळले असून ५२१ धावा केल्‍या आहेत. त्‍याच्‍या नावावर ३२ बळीही आहेत.

मागील वर्षी कोलकाताकडून खेळणार्‍या राहुल त्रिपाठीवर ४० लाखांपासून बोली सुरु झाली. यंदा त्‍याला सनरायजर्स हैदराबादने ८ कोटी ५० लाखांनावर बोली लावली. मागील वर्षी कोलकाताने त्‍याला ६० लाख रुपये मानधन दिले होते.
त्‍याने आयपीएलमध्‍ये ६२ सामन्‍यांमध्‍ये १ हजार ३८५ धावा केल्‍या आहेत.

अभिषेक शर्माही मालामाल

अष्‍टपैलू खेळाडू अभिषेक शर्माही आजच्‍या लिलावात मालामाल झाला. त्‍याच्‍यावर सनरायजर्स हैदराबादने ६.५० कोटींची बोली लावली. अभिषेकवर बोली लावण्‍यासाठी हैदराबाद, पंजाब आणि गुजरात संघांमध्‍ये जोरदार टक्‍कर झाली. मागील सीझनमध्‍ये अभिषेक याला हैदराबादमध्‍ये ५५ लाख रुपये मिळाले होते.

शिवम दुबे खेळणार चेन्नई सुपर किंग्जकडून

राजस्थान रॉसल्सकडून खेळणारा ऑल राऊंडर खेळाडू शिवम दुबे यंदाच्या आयपीएल हंगामात  चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आपल्याला दिसेल. त्याला  चेन्नईने ४ कोटी रूपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले.

‘या’ खेळाडूंची पाटी काेरीच !

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा ईआन मॉर्गन, ऑस्ट्रलियाचा वन-डेतील कर्णधार अॅरॉन फिंच, भारताचा कसोटी सलामीवीर चेतेश्वर पुजारा, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या चारही खेळाडूंकडे खरेदीदारांनी पाठ फिरवल्यामुळे या खेळाडूंची निराशा झाली आहे. इंग्लंडचा टी-२०तील सर्वोकृष्ट फलंदाज डेव्हिड मलान, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील मार्नश लाबुशेन, भारताचा सैारव तिवारी, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळा़डू जिमी निशम, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन यांचीही पाटी काेरीच राहिली.

मागील वर्षीच्या आयपीएल सीजनमझध्ये जिमी नीशम आणि सौरव तिवारी हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्स कडून खेळत होते तर, डेव्हिड मलान याला पंजाब किंग्जने आपल्या संघाकडून खेळण्याची संधी दिली होती.

हेही वाचलं का?

Back to top button