कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ मालवाहू ट्रक ने घेतला पेट, वाहनचालकांत भीतीचे वातावरण

ट्रकने घेतला पेट
ट्रकने घेतला पेट

कागल; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चेक पोस्ट नाक्याजवळ एका मालवाहू ट्रकने पेट घेतला. चेक पोस्ट नाक्याजवळ हॉटेल कामत शेजारी असतानाच या ट्रकने पेट घेतला. पेटलेल्या ट्रक पाहिल्यानंतर महामार्गावरिल वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यातून घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

या ट्रकमध्ये सुत असल्याने ट्रकने लवकर पेट घेतला. ट्रकने पेट घेतलेल्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. धुराचे लोट पसरल्याने वाहन चालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news