छगन भुजबळ यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना पत्र, म्हणाले… | पुढारी

छगन भुजबळ यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना पत्र, म्हणाले...

पुढारी ऑनलाइन : मध्य रेल्वेच्या मनमाड दौंड व मनमाड- हैदराबाद रेल्वे मार्गावरील भुयारी रस्त्यातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मंत्री भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या येवला मतदारसंघातील मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर पिंपळगाव जलाल व धामोडे येथे, तर मनमाड-नांदेड-हैदराबाद मार्गावर नगरसोल येथे रेल्वे फाटक होते. हे रेल्वे फाटक काढून रेल्वेने या ठिकाणी अंडर पास मार्ग तयार केले आहेत. मात्र, हे अंडर पास तयार करताना रेल्वेच्या तांत्रिक विभागाने  अतिशय चुकीच्या पद्धतीने बांधकाम केले आहे.

या भुयारी मार्गातून पाणी जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात या मार्गामध्ये तुडुंब पाणी भरलेले असते. भुयारी मार्गात पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यातील 4 ते 5 महिने हे भुयारी मार्ग बंद होतात. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊन त्यांना लांबच्या पर्यायी रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील दळणवळण सुरळीत होण्यासाठी या भुयारी मार्गातून पाण्याचा निचरा करण्याची कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणी नुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button