Pune Crime Branch Restructuring: गुन्हे शाखेची पुनर्रचना; पुण्यात सात परिमंडळांसाठी सात स्वतंत्र युनिट कार्यरत

वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण व तपासाला गती देण्यासाठी नवी रचना; एक एसीपी पदाची वाढ
Pune Crime Branch Restructuring
Pune Crime Branch RestructuringPudhari
Published on
Updated on

पुणे : नव्याने निर्माण केलेली पोलिस ठाणी आणि परिमंडळांचा केलेला विस्तार, या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचीही पुनर्रचना केली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच गुन्ह्यांच्या तपासाला देखील गती मिळणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune Crime Branch Restructuring
Sharad Pawar On Sunetra Pawar: सुनेत्रा पवार शपथ घेणार आहे हे मला माहीत नाही.. पत्रकार परिषदेत शरद पवारांचे मोठे खुलासे

आत्तापर्यंत शहरात गुन्हे शाखेचे 6 युनिट होते. पोलिस ठाण्यांची वाढलेली संख्या विचारात घेता आता 7 युनिट असणार असून, एक एसीपी (सहायक पोलिस आयुक्त) पददेखील वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात असलेल्या 7 परिमंडळसाठी 7 युनिट कार्यरत असणार आहेत.

शहरात सध्या 44 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या माध्यमातून गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवले जाते. गुन्हे शाखेअंतर्गत सहा युनिट्‌‍स, तसेच खंडणीविरोधी, अमलीपदार्थविरोधी आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी अशी प्रत्येकी दोन मिळून एकूण बारा पथके कार्यरत आहेत. ही सर्व पथके गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि एसीपींच्या देखरेखीखाली काम करतात.

Pune Crime Branch Restructuring
VSN CA Cricket League Final: आकाश कोयलेच्या अष्टपैलू खेळीवर व्हीएसएन सुपरकिंग्जचा शिक्कामोर्तब; ‘व्हिएसएन सीए क्रिकेट लीग’चे विजेते

या नव्या पुनर्वाटपानुसार गुन्हे शाखेच्या चार एसीपींमध्ये जबाबदारींचे विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त एक अंतर्गत युनिट एक ते तीन, खंडणीविरोधी पथक एकचा समावेश आहे, तर एसीपी दोनअंतर्गत युनिट चार ते सात तसेच खंडणीविरोधी पथक दोन असेल. एसीपी तीनअंतर्गत दरोडा व वाहनचोरीविरोधी आणि अमलीपदार्थविरोधी पथक एक आणि दोन यांचा समावेश आहे, तर प्रशासन, भरोसा सेल, एएचटीयू (मानव तस्करी प्रतिबंधक युनिट) हे एसीपी चार यांच्या अखत्यारीत असणार आहे. या नव्या बदलामुळे गुन्हे शाखेचे कामकाज अधिक समन्वयित, झोननिहाय आणि परिणामकारक होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मान्यतेने हे बदल करण्यात आले आहेत.

Pune Crime Branch Restructuring
Pune News | सिंहगड दंत महाविद्यालयाला दणका! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अखेर संलग्नता रद्द!

परिमंडळनिहाय युनिट

शहरात सध्या 44 पोलिस ठाणी आहेत. याचे विभाजन 7 परिमंडळात केले आहे. त्यातच आता गुन्हे शाखेचे 7 युनिट झाल्याने प्रत्येक परिमंडळासाठी एक युनिट कार्यरत असणार आहे. तसेच, नव्या रचनेत दरोडा, अंमली पदार्थ विरोधी पथकासाठी एक एसीपी असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news