VSN CA Cricket League Final: आकाश कोयलेच्या अष्टपैलू खेळीवर व्हीएसएन सुपरकिंग्जचा शिक्कामोर्तब; ‘व्हिएसएन सीए क्रिकेट लीग’चे विजेते

अंतिम सामन्यात गतविजेत्या बीस्मार्टवर 23 धावांची मात; सलग दुसऱ्या अंतिम फेरीत बीस्मार्ट अपयशी
VSN CA Cricket League Final
VSN CA Cricket League FinalPudhari
Published on
Updated on

पुणे : 13 व्या ‌‘व्हिएसएन सीए क्रिकेट लीग‌’ स्पर्धेत आकाश कोयले याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या मदतीने व्हीएसएन सुपरकिंग्ज संघाने गतविजेत्या बीस्मार्ट संघाचा 23 धावांनी सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

VSN CA Cricket League Final
Pune News | सिंहगड दंत महाविद्यालयाला दणका! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अखेर संलग्नता रद्द!

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत व्हीएसएन सुपरकिंग्ज संघाने 10 षटकांमध्ये 6 गडी गमावून 103 धावांचे आव्हान उभे केले. तन्मय सी. याने 30 धावा, किरण गोरगोटे याने 32 धावा आणि आकाश कोयले याने 22 धावा यांनी धावांचे योगदान देत संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली. गोलंदाजीमध्ये बीस्मार्टच्या यश शहा आणि शुभांक शहा यांनी एकेक गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बीस्मार्ट संघाचा डाव 80 धावांवर मर्यादित राहिला.

VSN CA Cricket League Final
Pawar vs Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पवार विरुद्ध पवार’ कोल्ड वॉर? अजितदादांनंतर राष्ट्रवादीत संघर्षाचे नवे पर्व

प्रथमेश शिरसाट (26 धावा) आणि साहील पारख (21 धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. पण व्हीएसएनच्या आकाश कोयले याने 12 धावांत दोन गडी, तर सचिन भट आणि प्रवीण नलावडे यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद करून संघाचा विजय साकार केला. बीस्मार्ट संघाने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत दाखल झाला होता, पण विजेतेपद कायम ठेवण्याचे त्यांचे स्वप्न व्हीएसएन सुपरकिंग्ज संघाने पूर्ण होऊ दिले नाही.

VSN CA Cricket League Final
Sunetra Pawar DCM: अजितदादांच्या अस्थिविसर्जनापूर्वीच सत्तेसाठी हालचाली कशासाठी? तटकरे-पटेलांच्या 'घाई'मुळे पवार कुटुंबीय नाराज

स्पर्धेचे पारितोषिक वितरण राम वाघमोडे, अनुज छाजेड आणि रोहन छाजेड, सेंट्रल बँकेचे नरेश जाधव आणि अंगद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या व्हीएसएन सुपरकिंग्ज आणि उपविजेत्या बीस्मार्ट संघाला करंडक आणि मेडल्स देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news