Pune Gang Crime: टोळी युद्धाचे सावट; ठोंबरे टोळीतील 'स्काय' पिस्तुलासह जेरबंद

आंदेकर टोळीने तोडला होता हाताचा अंगठा
Pune Gang Crime
Pune Gang CrimePudhari
Published on
Updated on

पुणे: सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील खुनी संघर्ष सुरू असताना, गायकवाड याचा निकटवर्तीय सूरज ठोंबरे टोळीतील एका पंटरला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पिस्तूल आणि काडतुसासह पकडले आहे. आकाश ऊर्फ स्काय मंगेश सासवडे (वय 27, रा. पंतप्रधान आवास योजना सोसायटी, नांदेड सिटी) असे त्याचे नाव आहे.

आकाश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात तीन, बंडगार्डन पोलिस ठाण्यात एक, फरासखाना पोलिस ठाण्यात एक, तसेच चॅप्टर केस, मोक्का, तडीपार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सूरज ठोंबरे याचा नंबरकारी असून, दोन वर्षांपूर्वी त्याची हद्दपारी संपली होती. तेव्हापासून तो पुणे शहरात राहत होता.

Pune Gang Crime
ID Check: गळ्यात लेस, पण ओळखपत्र गायब! महापालिकेत आता 'नो आयडी, नो एंट्री'

आंदेकर आणि गायकवाड टोळीतील रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची पथके अलर्ट मोडवर आहेत. बुधवारी (दि.१०) खंडणी विरोधी पथकाने सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, धीरज राऊत आपल्या पथकासह गस्तीवर होते. त्या वेळी पोलिस कर्मचारी अमोल आवाड यांना बातमीदाराने माहिती दिली.

एक व्यक्ती कंबरेला पिस्तूल लावून नांदेड सिटी परिसरात फिरत आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आकाश सासवडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळून आली. चौकशी त्याने हे पिस्तूल त्याच्या मित्राकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त शैलेश संखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Pune Gang Crime
Pune Water Supply: कुठे मध्यरात्री, तर कुठे पहाटे येणार पाणी; शहरात सोमवारपासून सम-विषम तारखांनुसार होणार पुरवठा

आंदेकर टोळीकडून २०१७ मध्ये आकाशवर हल्ला

आकाश सासवडे हा सूरज ठोंबरे याचा नंबरकारी असून, टोळीतील सक्रिय सदस्य आहे. २०१७ मध्ये आंदेकर टोळीतील मुनाफ पठाण व इतरांनी आकाश याच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये आकाश याच्या हाताचा अंगठा तुटला होता. याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आकाश याच्यावरील हल्ल्यामुळे आंदेकर आणि सूरज ठोंबरे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. यापूर्वी देखील त्यांच्यात भांडणे झाली होती. मात्र, ती आपआपसात मिटविण्यात आली होती.

कोण आहे सूरज ठोंबरे

सूरज ठोंबरे सराईत गुन्हेगार, आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी. २०१७ मध्ये ठोंबरे आणि आंदेकर टोळीत संघर्ष सुरू झाला. सध्या ठोंबरे जामिनावर बाहेर आहे. मात्र, त्याला पुणे जिल्हाबंदी आहे. आंदेकर टोळीसोबत बिनसल्यानंतर सोमनाथ गायकवाड देखील सूरज ठोंबरे टोळीत सामील झाला.

टोळीयुद्ध रक्तचरित्राच्या वाटेवर

आकाश सासवडे याला पोलिसांनी पिस्तुलासह पकडले आहे. त्याच्यावर आंदेकर टोळीने हल्ला केला होता. त्यामुळे त्याला कदाचित परत हल्ल्याची भीती असावी म्हणून त्याने ते बाळगल्याचा कयास आहे. मात्र, त्या निमित्ताने अनेक सवाल देखील उपस्थित झाले आहेत. सद्यःस्थितीत सोमनाथ गायकवाड आणि आंदेकर टोळीत संघर्ष सुरू आहे. निखिल आंदेकर टोळीने केलेला निखिल आखाडेचा खून.

त्याचा बदला म्हणून गायकवाड टोळीने वनराज आंदेकरचा खून केला. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गायकवाडचा मुलगा आणि अनिकेत दुधभातेचा भाऊ यांना मारण्याचा प्लॅन केला. मात्र, पोलिसांना चाहुल लागल्याने तो फसला. त्यानंतर या टोळीने गणेश कोमकर याचा मुलगा आयूष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर याचा खून केला. त्यानंतर सॅम उर्फ समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा आंदेकर टोळीने काटा काढला. मे महिन्यात परत आंदेकर टोळीने आकाश म्हस्के याचा भाऊ अक्षय म्हस्के याच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार केले. मात्र, सुदैवाने तो बचावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news