ID Check: गळ्यात लेस, पण ओळखपत्र गायब! महापालिकेत आता 'नो आयडी, नो एंट्री'

२०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना गेटवरच अडवले
ID Check
ID CheckPudhari
Published on
Updated on

पुणे: महापौर कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्यानंतर महापालिका प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार केला आहे. त्याचीच प्रचिती गुरुवारी महापालिका भवनात पाहायला मिळाली.

ओळखपत्राशिवाय केवळ महापालिकेचे नाव असलेली 'लेस' गळ्यात अडकवून आलेल्या तब्बल २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावरच रोखले. आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक व्यक्तीची तपासणी आणि ओळखपत्र पडताळणीनंतरच प्रवेश देण्यात आल्याने अनेकांची तारांबळ उडाली.

ID Check
Khed Ghat Landslide Risk: पुणे-नाशिक महामार्गावरील खेड बाह्यवळण घाटात दरड कोसळण्याची भीती

महापौर कार्यालयाला महापालिका भवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी प्राप्त झाला होता. या घटनेनंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. संपूर्ण इमारत रिकामी करून कसून तपासणी करण्यात आली. तपासाअंती बॉम्ब असल्याची माहिती अफवा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत सुरक्षा उपाययोजनेबाबत कडक भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका भवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणे तसेच वैध ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्याचे स्पष्ट आदेश सुरक्षा विभागाला दिले.

ID Check
Cockroach Janta Party Protest: सडलेल्या यंत्रणेला कॉकरोच करणार ‘नीट’

आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करत गुरुवारी महापालिका भवनाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वेळी अनेक कर्मचारी गळ्यात महापालिकेचे ओळखपत्र लावून आले होते.

मात्र, मोठ्या संख्येने कर्मचारी आणि कंत्राटी कामगार केवळ महापालिकेचे नाव व बोधचिन्ह असलेली लेस घालून आल्याचे आढळले. त्यांच्या गळ्यात ओळखपत्र नसल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरच रोखले.

विशेष म्हणजे, अशा कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश कंत्राटी कर्मचारी आणि विविध ठेकेदारांच्या मनुष्यबळाचा समावेश होता. संबंधितांकडे वैध ओळखपत्र नसल्याने त्यांची पडताळणी करून त्यांना गेट पास देण्यात आला आणि त्यानंतरच महापालिका भवनात प्रवेशाची परवानगी देण्यात आली.

आयुक्तांच्या निर्देशानुसार सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून, ओळखपत्राशिवाय कोणालाही थेट प्रवेश दिला जाणार नाही. आवश्यक पडताळणीनंतरच गेट पासच्या माध्यमातून प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेतील ही कडक भूमिका पुढील काळातही कायम राहणार आहे.

- राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news