Consumer Court: फ्रीज विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दणका

‘डिस्प्ले’साठी ठेवलेला फ्रीज नवीन म्हणून विक्री; आयोगाने ग्राहकाला 25 हजारांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश
फ्रीज विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दणका
फ्रीज विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दणकाPudhari
Published on
Updated on

पुणे: दुकानात प्रदर्शनासाठी (डिस्प्ले) ठेवलेला रेफ्रिजरेटर (फ्रीज) घेण्यास नकार दिल्यानंतरही ग्राहकाला ‌‘डिस्प्ले‌’साठीचा फ्रीज नवीन म्हणून देण्यात आला. विक्रेत्याने केलेली ही कृती अनुचित व्यापाराचा एक प्रकार ठरतो. कंपनीने ग्राहकाला सदोष ग्राहक सेवा दिल्याने कंपनीने ग्राहकाला 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश पुणे ग्राहक आयोगाने दिला. (Latest Pune News)

फ्रीज विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दणका
Grand Challenge Road Repair: पुण्यात सायकल स्पर्धेआधीच वाहनचालकांसमोर ‘ग्रँड चॅलेंज’

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरुण गायकवाड आणि सदस्या प्रणाली सावंत यांनी हा निकाल दिला. दसरा-दिवाळीच्या उत्सवानिमित्त खरेदीसाठी आलेल्या शिवाजीनगर येथील रहिवासी डॉ. विरेंद्र जाधवराव यांनी प्रदर्शनासाठी (डिस्प्ले) ठेवलेला रेफ्रिजरेटर (फ्रीज) दिल्याप्रकरणी ग्राहकाने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व शोरूमच्या व्यवस्थापकाविरोधात ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती.

फ्रीज विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दणका
Child Lost And Found: पुणे रेल्वे स्थानकावर हरवलेला ६ वर्षांचा चिमुकला १५ मिनिटांत सापडला

त्यांनी 8 सप्टेंबर 2019 रोजी संबंधित कंपनीच्या शोरूममधून 65 हजार रुपयांचा फीज विकत घ्यायचे ठरविले. त्या वेळी त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना डिस्प्लेसाठी ठेवलेला फीज न देता नवीन फीज देण्याची स्पष्ट विनंती केली होती; तसेच खबरदारी म्हणून ‌’डिस्प्ले‌’साठी ठेवलेल्या फीजच्या नोंदणी क्रमांकाचे छायाचित्रही घेतले होते. कंपनीच्या प्रतिनिधीने ही विनंती मान्यही केली होती. मात्र, प्रत्यक्षात फीज घरी आला, तेव्हा तो ‌’डिस्प्ले‌’ला ठेवलेलाच असल्याचे नोंदणी क्रमांकावरून लक्षात आले. याशिवाय तक्रारदारांनी डेबिट कार्ड वापरून कर्ज घेताना कंपनीच्या प्रतिनिधींनी चुकीची माहिती दिल्याने त्यांच्या खात्यातून पाच हजार 415 रुपयांची छुपी रक्कमही वसूल करण्यात आल्याचा दावा केला.

फ्रीज विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दणका
Silver Chariot: भोर येथील स्वामी समर्थचरणी चांदीचा रथ अर्पण; पायी दिंडी अक्कलकोटसाठी रवाना

या दोन्ही तक्रारींचे निवारण न झाल्याने तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. दरम्यान, तक्रारदारांची नोटीस मिळण्यापूर्वीच कंपनीने तक्रारदारांकडे दिलगिरी व्यक्त केली. उत्सव काळातील घाईगडबडीत अनावधानाने ‌‘डिस्प्ले‌’चा फ्रीज नवीन म्हणून पाठविल्याची कबुली देत कंपनीने तक्रारदारांना फ्रीज बदलून दिला; तसेच दहा हजार रुपयांचा परतावाही दिला, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news