

भोर: भोर शहरातील जागृत देवस्थान असणाऱ्या श्री स्वामी समर्थचरणी चांदीचा रथ अर्पण करण्यात आला. वेनवडी (ता. भोर) येथील उद्योजक विक्रम चव्हाण यांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. 23) माजी आमदार संग्राम थोपटे, स्वरूपाताई थोपटे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थचरणी चांदीच्या रथाचे अर्पण करण्यात आले. (Latest Pune News)
या वेळी स्वामी समर्थ ट्रस्टचे अध्यक्ष मयुरेश रायरीकर, उपाध्यक्ष मुकुंद रायरीकर, सचिव अवधुत रायरीकर, सुषमा मधुकर चव्हाण, कमल चव्हाण, मधुकर चव्हाण, विश्वजित चव्हाण, ॲड. दीपक चौधरी, ॲड. संजय रोमण, अमित सागळे, आप्पा दवळी, नीलेश डाळ, मंगेश शिंदे, रमेश ओसवाल, अभी भेलके, अमोल पांगारे, देवा गायकवाड, सोमनाथ ढवळे, ईश्वर पांगारे, रमेश चव्हाण आदी स्वामीभक्त उपस्थित होते.
लोकनेते अनंतराव थोपटे यांच्या आशीर्वादाने मधुकर गणपत चव्हाण, कमल मधुकर चव्हाण यांच्याकडून श्री स्वामी समर्थ चरणी हा रथ अर्पण करण्यात आल्याची माहिती विक्रम चव्हाण यांनी दिली. भोर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्यासाठी या चांदीच्या रथाचा शुभारंभ करण्यात आला.
शुक्रवारी (दि. 24) भोर ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. या वेळी शहरातील स्वामी भक्तांनी मनोभावे स्वामीच्या रथापुढे रांगोळी, सडा, फुलांची उधळण करत दर्शन घेतले. संपूर्ण पायी वारी दिंडी सोहळ्याचे सोमनाथ ढवळे नियोजन करतात.