पुणे : कॉंग्रेस नगरसेवक अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपत प्रवेश

पुणे : कॉंग्रेस नगरसेवक अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपत प्रवेश
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होण्यास‌ सुरूवात झाली आहे. भाजप नगरसेविकेच्या‌ पतीने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता महापालिकेतील कॉंग्रेसचे माजी गटनेते व नगरसेवक अरविंद शिंदे यांचे पुतणे प्रणय शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षात स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे प्रत्येकजण भाजपशी जोडला जात आहे. त्यामुळेच भाजपा आज पहिल्‍या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह मोदी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे, असे मत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पक्ष प्रवेशानंतर प्रणय शिंदे म्हणाले, भाजपचे विचार आणि नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे. भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी आम्‍ही  प्रामाणिक प्रयत्न करणार, असे शिंदे म्‍हणाले.

दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी केली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृहनेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, शहर सरचिटणीस दीपक पोटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, अभिजीत राऊत आदी उपस्थित होते.

हे ही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news