Pune Accident : शिक्रापुरातील विचित्र अपघातात पाच जण ठार | पुढारी

Pune Accident : शिक्रापुरातील विचित्र अपघातात पाच जण ठार

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे – नगर महामार्गावर शिक्रापूर नजीक चोवीसावा मैल परिसरात ट्रक, कार व दुचाकीच्या विचित्र अशा झालेल्या भीषण अपघातात ( Pune Accident ) पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. २३) सायंकाळी घडला.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नगर महामार्गवरून शिरूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच १२ डीजे ९६५७) हा रस्ता दुभाजक तोडून आपली मार्गिका बदलून पुणे दिशेला शिरला. या वेळी इर्टिगा (एमएच १२ आरके 1217) ही कार पुण्याहून नगरच्या दिशेने निघाली होती. हा ट्रक या कारवर आदळल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला. परंतु याचवेळी बाजूला असलेल्या दोन दुचाकी (एमएच १२ आर ४०५०) आणि (एमएच १२ टीजी ९३५१) या अपघाताच्या कचाट्यात सापडल्या. यामध्ये दुचाकीवरील दांम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ( Pune Accident )

दुचाकीवरील विठ्ठल पोपट हिंगाडे व रेश्मा विठ्ठल हिंगाडे (रा. वासुंडे, ता. पारनेर, जि. नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. तर इर्टिगा कारमधील लीना राजू निकाशे (वय अंदाजे 18) हिचा मृत्यू झाला. दुसऱ्या मृताचे नाव अक्षय असल्याचे पोलिसांनी सांगितले. ( Pune Accident )

शिक्रापूर पोलिसांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त गाड्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरु केली व जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Back to top button