पुणे : सत्ताधारी भाजपला पहिला धक्का; भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश | पुढारी

पुणे : सत्ताधारी भाजपला पहिला धक्का; भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपच्या नगरसेविका शितल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी प्रवेश केला. नगरसेविका सावंतही लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपला पहिला धक्का बसला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय येथे सावंत यांनी कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार सुनिल टिंगरे उपस्थित होते. राज्य सभेचे माजी खासदार संजय काकडे यांचे समर्थक म्हणून सावंत यांची ओळख होती. गत पालिका निवडणुकीत सावंत यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

गत आठवड्यात प्रभाग रचना जाहीर झाल्यावर भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप- प्रत्यारोप रंगले होते. मात्र, अवघ्या आठवडा भरातच राष्ट्रवादीने भाजपच्या नागरसेविकेच्या पतीला राष्ट्रवादीत घेतले आहे. नगरसेविका सावंत यांच्या नगरसेविका पदाच्या राजीनाम्याची तांत्रिक प्रक्रिया झाली नसल्याने त्यांचा प्रवेश लांबला असून पुढील आठवड्यात त्याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले. सावंत हे भाजपाचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या वडगाव शेरी मतदार असल्याने मुळीक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचलं का 

Back to top button