पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा हरीण जागीच ठार

पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा हरीण जागीच ठार
Published on
Updated on

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी-लोणी देवकर रस्त्यावरिल कौठळी वन जमीन हद्दीत आज (रविवार) अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा जातीचे हरिण जागीच ठार झाल्याचे वनविभागाने सांगितले.

या विषयी अधिक माहिती अशी की, लोणी देवकर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वर्दळ असते. रविवारी सकाळी बाराच्या सुमारास अज्ञात वाहनाने रस्त्यावरील चिंकारा हरणास जोरदार धडक दिली. यामध्ये ते हरीण जागीच ठार झाले. चिंकारा हरीण रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत पडलेले गावकऱ्यांना समजताच त्यांनी तातडीने वन विभागाला कळविले.

वनपाल अशोक नरुटे, वनरक्षक गणेश बागडे, दादा मारकड व वनकर्मचारी यांनी पंचनामा करून हरणाचे शवविछेदनाठी रुई येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले; मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्यासे त्या मृत हरणास इंदापूर येथील पशुवैद्यकिय रुग्णालयात आणून शवविछेदन करण्यात आले.

हे चिंकारा जातीची दीड वर्षाचे मादी हरीण होते. ते सकाळी रस्ता ओलांडताना त्याच्या पोटाला जबर मार लागल्याने ही घटना घडली असल्याचे वनपाल नरुटे यांनी सांगितले.

पशुपक्ष्यांसाठी रुग्णवाहिकेची फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबची मागणी…

इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वनक्षेत्र असून, विविध पशुपक्षी मोठ्या संख्येने आहेत. अचानक जखमी झालेले प्राणी तसेच पक्ष्यांना उपचार व जीवदान देण्यासाठी रुग्णवाहिका असावी. यासाठी वन विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करावी. तसेच दिवसा व रात्रीची वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी. स्त्याच्या दुतर्फा वाहने सावकाश चालवण्याची फलके उभारावीत. तसेच आवश्यकतेनुसार रस्त्यावरती सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्रान्वये गतिरोधक बसविण्याची मागणी करणार असल्याचे फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे वैभव जाधव, ॲड. सचिन राऊत, ॲड श्रीकांत करे, अर्जुन जाधव यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news