राज्य सरकारचा आदेश : सलूनसोबत ब्युटी पार्लर अन् जीम सुरू राहणार ! | पुढारी

राज्य सरकारचा आदेश : सलूनसोबत ब्युटी पार्लर अन् जीम सुरू राहणार !

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्य सरकारने ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यामध्ये सलून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे राज्य सरकारचा आदेश होता. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यात वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत.

या नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने म्हंटलं आहे की, “ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल”, असेही राज्य सरकारचा आदेश यामध्ये म्हंटलं आहे.

व्यायामशाळेसंदर्भातील आदेश 

“जीमदेखील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, व्यायाम करताना मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. तसेच व्यायामशाळेत केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

राज्यात काय सुरू राहणार अन् काय बंद राहणार?

 • पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.
 • रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
 • लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
 • अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
 • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
 • शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.
 • जलतरण तलाव बंद राहणार.
 • केशकर्तनालये, ब्युटी पार्लर आणि जीम ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.
 • जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
 • प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
 • शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इतरवेळी ५० टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
 • रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.
 • नाट्यगृह आणि सिनेमागृह १२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
 • आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार.
 • राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.

Back to top button