Pune Chakan Shikrapur Highway: पुण्यासाठी मोठी खुशखबर! तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला ₹4207 कोटींची मंजुरी

4 पदरी महामार्गामुळे वाहतूक कोंडी कमी; औद्योगिक विकासाला मोठी चालना
Highway
HighwayPudhari
Published on
Updated on

चाकण: राज्य शासनाने तळेगाव-चाकण-शिक्रापूर (महामार्ग 548-डी) या महामार्गाच्या कामाला अखेर मंजुरी दिली आहे. या महामार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाचे सुमारे 4207 कोटी रुपये खर्चाचे हे काम माँटे कार्लो लिमिटेड कंपनीला मंजूर करण्यात आले आहे. आता ही कंपनी रस्त्याचे काम चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणार आहे.

Highway
Pune Section 155 Scam: पुण्यात ‘कलम 155’ घोटाळा उघड; 424 प्रकरणांत मोठा गैरप्रकार!

राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार 53.2 किमीचा हा मार्ग चारपदरी उन्नत तसेच जमिनीला समांतर रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे. या महामार्गाच्या कामामुळे निश्चितच पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासास मदत होणार आहे. या संपूर्ण परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मदत होणार आहे.

Highway
Nasrapur Murder Case: मोबाईलच्या वादातून खून; नसरापूरमध्ये हॉटेल कामगाराचा थरार

हा मार्ग लवकर होण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व आमदार बाबाजी काळे यांच्यासह शिरूर आणि मावळच्या आमदारांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळाने या कामाला मंजुरी दिलेली आहे.

Highway
Bhor Ram Janmotsav: भोरचा श्री रामजन्मोत्सव; 300 वर्षांची वैभवशाली परंपरा आजही कायम

या रस्त्याच्या कामाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. त्यात या कामास मान्यता देण्यात आली आहे. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग््रावाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Highway
Pune Illegal Parking Metro: मेट्रोखालीच वाहनतळ! कसबा पेठेत बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

...असा असणार रस्ता

तळेगाव ते चाकण क्रमांक 548 डी राष्ट्रीय महामार्ग 0 ते 26 किलोमीटरदरम्यान 4 पदरी उन्नत आणि 4 पदरी जमिनीस समांतर असणार आहे. तसेच, याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूरदरम्यान पुढे 26 ते 43 किलोमीटर लांबीमध्ये 4 पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाइन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news